AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Munde on Dairy Products: आता दुधात भेसळ करणाऱ्यांचं काही खरं नाही, तुकाराम मुंडेंचा सर्वात मोठा निर्णय, थेट…

तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार स्विकारल्यापासून कारवाईचा धडाका लावला आहे. आतापर्यंत अनेक हॉटेल्स आणि इतर ठिकाणांवर एफडीएकडून छापे टाकण्यात आले आहेत. आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

Tukaram Munde on Dairy Products: आता दुधात भेसळ करणाऱ्यांचं काही खरं नाही, तुकाराम मुंडेंचा सर्वात मोठा निर्णय, थेट...
tukaram mundeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 03, 2026 | 5:13 PM
Share

तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्विकारताच कारवाईचा धडाका लावला आहे. आतापर्यंत एफडीकडून अनेक हॉटेल आणि जिथे -जिथे अन्न पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याचा संशय आहे, अशा अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्रात गोवा, गुटखा या सारख्या तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आहे, मात्र तरी देखील तुकाराम मुंडे हे एफडीचे आयुक्त होण्यापूर्वी या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री कधी चोरीच्या मार्गाने तर कधी खुलेपणाने सुरूच होती. याविरोधात तुकाराम मुंडे यांनी कडक अ‍ॅक्शन घेतली आहे, या प्रकरणातील आरोपींविरोधात मोकोका अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं.

दरम्यान मुंडे यांनी आता आपला मोर्चा हा दुधात होणाऱ्या भेसळीकडे वळवला आहे. त्यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली आहे, ग्राहकांच्या ताटापर्यंत शुद्ध दूध जाणं हा ग्राहकांचा हक्क असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  भेसळमुक्त दूध ग्राहकांना मिळावं यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी आता दूध उत्पादक आणि विक्रेत्यांना नवे नियम लागू केले जाणार असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले मुंडे? 

ग्राहकांच्या ताटापर्यंत शुद्ध दूध जाणं हा ग्राहकांचा हक्क आहे. भेसळमुक्त दूध ग्राहकांना मिळावं यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी आता दूध उत्पादक आणि विक्रेत्यांना नवे नियम लागू केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांची बैठक देखील घेण्यात आली आहे.  दूध संकलन केंद्र, दूध शितकरण सेंटर, दुग्ध प्रतिक्रिया युनिट्स, आणि उत्पादक, वितरक, वाहतूकदार, घाऊक विक्रेते यांना देखील हे नियम लागू असणार आहेत. यासोबतच नवे नियम हे किरकोळ दूर विक्रेते यांना देखील लागू असणार आहेत.  पनीर, खवा, तूप, दही, चीज, दूध पावडर या सारख्या उत्पादनावरही नवे नियम  लागू असतील, अशी माहिती यावेळी तुकाराम मुंडे यांनी दिली आहे.  त्यामुळे आता दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. या मुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ