AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिच्यातून ईव्हीएम नेले त्याच बसमध्ये विद्यार्थ्याला सापडली अशी गोष्ट; पाहाताच चालक, वाहकाला बसला मोठा धक्का, अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं?

अहिल्यानगमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या बसमधून ईव्हीएम नेण्यात आले होते, त्या बसमध्ये विद्यार्थ्यांना जे सापडलं ते पाहून प्रवाशांसह चालक आणि वाहकाला मोठा धक्का बसला आहे.

जिच्यातून ईव्हीएम नेले त्याच बसमध्ये विद्यार्थ्याला सापडली अशी गोष्ट; पाहाताच चालक, वाहकाला बसला मोठा धक्का, अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं?
प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Nov 22, 2024 | 3:10 PM
Share

विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान झालं, राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झालं आहे. उद्या 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. सोबतच विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाचं देखील कौतुक होत आहे.

नेमकं काय घडलं?

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली, मतदानासाठी ज्या बसमधून ईव्हीएम नेण्यात आले त्या बसच्या शिटखाली गुरुवारी सायंकाळी  500 रुपयांच्या नोटांचे दोन बंडल विद्यार्थ्यांना दिसून आले. सदर विद्यार्थ्यांनी 86 हजारांची ही रक्कम एसटी बसच्या वाहक सविता आडांगळे यांच्याकडे सुपूर्द केली. प्रशासनाने निवडणूक कामासाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच मोठी रक्कम मिळून आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आलं आहे. ही रक्कम नेमकी कोणाची असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

कोपरगाव आगाराची बस MH 40 Y 5679 या क्रमांकाची बस स्ट्रॉंग रूम पासून ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन मतदान केंद्रापर्यंत जाऊन आली. त्यानंतर त्याच बसने गुरुवारी वैजापूर कोपरगाव अशा बस फेऱ्या केल्यानंतर संध्याकाळी संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल येथून विद्यार्थ्यांना घेऊन ही बस धामोरीच्या दिशेने जात असताना बसच्या शेवटच्या सीटाखाली प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपयांच्या नोटांचे दोन बंडल मिळून आले.

साईराज कदम नावाच्या विद्यार्थ्याने तसेच त्याच्या सहकाऱ्यांनी हे बंडल बसमधील संजीवनी इंग्लिश मीडियमचे कर्मचारी रोहित होन आणि सचिन भालके यांच्याकडे दिली. त्यांनी ते नोटांचे बंडल महिला वाहक सविता अडांगळे यांच्याकडे दिले. त्यानंतर सविता अडांगळे यांनी बस डेपो मॅनेजर अमोल बनकर यांनाही याबाबत माहिती देऊन ती रक्कम बस डेपोत नेऊन जमा केली. ही रक्कम 86 हजार पाचशे रुपये एवढी असल्याची माहिती देण्यात आली आहे. संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी तेथे काम करणारे कर्मचारी तसेच महिला वाहकाने प्रामाणिकपणा दाखवत सदरची रक्कम जमा केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.