AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हकालपट्टीने संताप… सुधाकर बडगुजर थेट उद्धव ठाकरेंवर घसरले; नाशिकमध्ये मोठ्या घडामोडी घडणार?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे, पण बडगुजर यांनी हा आरोप फेटाळला आहे. त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केल्याबद्दल ही शिक्षा असल्याचे म्हटले आहे.

हकालपट्टीने संताप... सुधाकर बडगुजर थेट उद्धव ठाकरेंवर घसरले; नाशिकमध्ये मोठ्या घडामोडी घडणार?
हकालपट्टीनंतर सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया काय?
| Updated on: Jun 04, 2025 | 2:05 PM
Share

शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेते सुधाकर बडगुजर यांनी काल नाराजी व्यक्त करत मनातील खदखद बोलून दाखवली होती. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर आज त्यांची पक्षातून थेट हकालपट्टी करण्यात आल्याने मोठी खळबळ माजली आहे. सुधाकर बडगुजर यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पक्षाच्या या कारवाईनंतर आता सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला.

पक्षामध्ये उघडपणे नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे. आणि जर त्या गुन्ह्याच्या शिक्षेचं हकालपट्टीमध्ये रुपांतर होत असेल तर त्याचं उत्तर मी काय देणार ? असा सवालच बडगुजर यांनी विचारला आहे. पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता, मात्र मी पक्षाविरुद्ध कोणंतही वक्तव्य केलेलं नाही असं बडगुजर यांनी स्पष्ट केलं. असं कोणंतही वक्तव्य मी केलं असेल तर ते मीडियाच्या माध्यमातून पुढे आणावं असं आव्हानही त्यांनी दिलं. पण संघटनात्मक बदल झाले तेव्हा नाराजी व्यक्त केली, काल उघडपणे बोलून दाखवलं, तो जर गुन्हा असेल तर तो मी केलाय असा पुनरुच्चार त्यांनी केला. त्याची शिक्षा जर हकालपट्टी असेल तर ती मला मान्य आहे, असंही बडगुजर म्हणाले.

यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधणार आहात का, संवाद साधणार का असा सवाल बडगुजर यांना विचारण्यात आला असता त्यांनी थेट उत्तर दिलं. हकालपट्टीनंतर कोणता संवाद साधणार ? न्यायलयातसुद्धा एकतर्फी निर्णय होत नसतो, दोन्ही बाजू ऐकल्यानंतर निर्णय दिला जातो असं म्हणत त्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. शिवसेना कार्यालयात आजा काही नियोजित प्रवेश होते, पण काहीव वैयक्तिक कार्यक्रमामुळे मी बाहेर आहे, त्यामुळे पक्ष कार्यालयात जाऊ शकलो नाही, असे ते म्हणाले.

 काय आहे प्रकरण ? 

नाशिकमधील मोठे नेते असलेले सुधाकर बडगुजर यांनी, आपण पक्षात नाराज आहोत, असे काल सांगितलं होतं. त्यानी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. केवळ मीच नव्हे तर पक्षात आणखी 10 ते 12 जण नाराज आहेत. मात्र आपली नाराजी संजय राऊत यांच्यावर नसल्याचे स्पष्ट करत पक्ष संघटनेत बदल करताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही म्हणून नाराज आहे, महानगरप्रमुख विलास शिंदे देखील नाराज आहेत असं सुधाकर बडगुजर काल म्हणाले होते.

त्यामुळे मोठी खळबळ माजली होती, शिवेसेनेत मोठा भूकंप होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यातच आज बडगुजर यांची शिवसेना उद्धव ठाकरे गटातून हकालपट्टी केल्याचे जाहीर करण्यात आलं.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी