AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाषण सुरू झालं पण…अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, म्हणाल्या, आज दादा…

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार भावुक झाल्या.

भाषण सुरू झालं पण...अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, म्हणाल्या, आज दादा...
SUPRYA SULEImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 11, 2026 | 5:28 PM
Share

Sunetra Pawar : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षातर्फे मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पक्षाच्या प्रमुख तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमात पक्षाचे इतरही अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. हा कार्यक्रम दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतींना समर्पित करण्यात आला. कार्यक्रमात अनेक नेत्यांनी भाषण केले. पक्षाला पुढे कसे घेऊन जायचे? पक्षाचे काम करण्यासाठी काय करायला हवे? पक्ष कसा वाढेल? यावर भाष्य केले. पक्षाच्या प्रमुख या नात्याने सुनेत्रा पवार यांनीदेखील उपस्थितांना संबोधित केले. परंतु यावेळी अजितदादांचे नाव येताच सुनेत्रा पवार यांना गहिवरून आलं. त्या भावुक झाल्या.

आपल्या सर्वांचे लाडके….

सुनेत्रा पवार भाषण करायला उभ्या राहिल्या. यावेळी त्यांनी सुरुवातीला महापुरुषांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख केला. अजितदादांचा उल्लेख येताच सुनेत्रा पवार यांना गहिवरून आलं. त्या भाषणादरम्यान भावुक झाल्या. ‘आपल्या सर्वांचे लाडके नेते अजितदादा यांना भावपूर्ण आदरांजली वाहते. त्यांना वंदन करते,’ असे सुनेत्रा पवार भावुक होत म्हणाल्या. सुनेत्रा पवार भावुक झाल्याचे दिसताच कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या स्मरनार्थ अमर रहे अशा घोषणा दिल्या.

दादांनी जे कठोर परिश्रम घेतले ते सगळ्यांनी पाहिले

आपल्या भाषणात पुढे बोलताना, आपल्या सर्वांचे नेते दादा आज आपल्यात नाही. आणि त्यांच्याशिवाय होणारा हा पहिलाच वर्धापन दिवस आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या सारखा युगपुरुष यांची प्रेरणा घेऊन आपण काम करतोय, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. तसेच शिव शाहू फुले यांचा विचार पुढे घेऊन जाताना अनेकांनी मोलाचे योगदान दिले. आजचा वर्धापन दिनाची थीम ही समर्पण संघर्ष संकल्प अशी होती. कारण दादांनी राज्याच्या विकासाला दिलेले समर्पण आपण पाहिलेले आहे. दादांच्या कामाची पद्धत सगळ्यांनी पाहीली. दादांनी जे कठोर परिश्रम घेतले ते सगळ्यांनी पाहिले आहेत, अशाही भावना त्यांनी व्यक्त केल्या.

राष्ट्रवादी परिवार माझ्या पाठीशी राहिला

राज्याला देशाच्या सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी त्यांचा प्रचंड दादांनी लोकहितासाछी प्रचंड मेहनत घेतली. दादांने विचार मुल्य आणि कामाची पद्धत नेहमी मार्गदर्शक ठरेल. दादांनी जागा कुणीच घेऊ शकत नाही, असे मत यावेळी सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले. आदरणीय दादांच्या पच्थात सगळा राष्ट्रवादी परिवार माझ्या पाठीशी राहिला.. दादांना फक्त अडीच वर्षांचा कालावधी मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय पातळीवर त्याना काम करता आले त्यांनी सातत्याने काम केले, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर