AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्डब्रेक विजय; 2029 ला बारामतीमध्ये पवार विरोधात पवार निवडणूक होणार? सर्वात मोठी बातमी

मोठी बातमी समोर येत आहे, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय झाला आहे. त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. दरम्यान त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्डब्रेक विजय; 2029 ला बारामतीमध्ये पवार विरोधात पवार निवडणूक होणार? सर्वात मोठी बातमी
sunetra pawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 04, 2026 | 4:14 PM
Share

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या मतदारसंघात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांसोबतच पोटनिवडणूक पार पडली. अखेर आता या पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे. या पोटनिवडणुकीमध्ये महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. सुनेत्रा पवार  या या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या आहेत, त्यांनी यापुर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. सुनेत्रा पवार या तब्बल  २,१८,९३० एवढ्या प्रचंड मताधिक्याने बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. दरम्यान सुनेत्रा पवार यांचा विजय झाल्यानंतर आता 2029 मध्ये या मतदारसंघात उमेदवार कोण असणार? या मतदारसंघात पुन्हा एकदा पवारांविरोधात पवार निवडणूक  होणार का? अशा चर्चेला उधाण आलं आहे. यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले उमेश पाटील? 

बारामतीकरांनी  सुनेत्रा वहिनींना देशात रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवून दिला आहे. बारामतीकर त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाला, मात्र काही नेत्यांनी अपक्ष उमेदवारांना माघार घेऊ नये यासाठी कॉल केला. त्यांना कोणी कॉल केला हे योग्यवेळी जाहीर करेल.  2029 ला बारामतीचा उमेदवार कोण याबाबत कोणीही आत्ताच ठरवू शकत नाही, पार्लमेंटरी बोर्ड त्याबाबत निर्णय घेईल.  2029 साठी आणखी तीन- साडेतीन वर्ष बाकी आहेत,  त्यामुळे आत्ताच त्यावर चर्चा करणे योग्य ठरणार नाही.  जरी कोणी म्हणाले पवार विरुद्ध पवार होणार,  मात्र काहींनी असं देखील सांगितले की यापुढे बारामतीत पवार विरुद्ध पवार होणार नाही, असं यावेळी उमेश पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजपचा मोठा विजय 

आज 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे.  आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरीमध्ये भाजपने बहुमताकडे वाटचाल केली आहे. तर केरळमध्ये मात्र डाव्यांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने डाव्या पक्षांच्या एकमेव गडाला सुरूंग लावला आहे, केरळमध्ये काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे.

Follow Us
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
मोठी बातमी! इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला मोठा प्रस्ताव!
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधित...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच होणार मोठा फेरबदल, पुढे...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच  होणार मोठा फेरबदल, पुढे काय घडणार ?
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
मोठी बातमी! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय असणार?
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय; तुमच्या खिशावर काय परिणाम?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरे संतापले
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरेंनी काँग्रेसला सुनावले खडेबोल
35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी..
Sanjay Raut | 35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी संजय राऊतांची मिश्किल टोलेबाजी!
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
CJP | मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी बैठक; मोठा निर्णय होणार?