राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सुनील तटकरे यांचं स्फोटक भाषण, नेमकं काय-काय म्हणाले?

"अजित दादा त्यावेळी नवखे होते. मी इतिहासाचा थोडा अभ्यासक आहे. तरूण मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांची इतिहासात नोंद झाली. अजित पवार 1999 ते 2004 मंत्री होते. पहिल्यांदा शरद पवारांना सात वर्षांचा अनुभव असताना शरद पवार मुख्यमंत्री होते. अजित पवार यांना सात वर्षांचा अनुभव होता. पण त्यांना मुख्यमंत्री केलं नाही", असं सुनील तटकरे आपल्या भाषणात म्हणाले.

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सुनील तटकरे यांचं स्फोटक भाषण, नेमकं काय-काय म्हणाले?
खासदार सुनील तटकरे
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 9:03 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25 वा वर्धापन दिवस आहे. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून मुंबईत षण्मुखानंद सभागृहात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांनी स्फोटक भाषण केलं. “पक्ष कार्याध्यक्ष म्हणून सर्वांचं स्वागत करतो. पक्षाची पंचवीस वर्षांची वाटचाल तुम्ही पाहिली. स्वाभिमानाचा आणि परकीय नागरिकत्वाच्या विरोधात मुद्दा घेतला. घेतलेल्या भूमिकेत बदल करावा लागतो हेही आपल्याला पाहायला मिळालं. काँग्रेसच्या नेत्वृवावर टीका त्यावेळी केलेली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी 1999 मध्ये प्रचंड मेहनत केली होती. निवडणुकीचे निकाल आल्यावर शरद पवार यांनी परकीय नागरिकत्वाच्या विरोधात भूमिका घेतली. त्यांच्यासोबत आपण गेलो”, असं सुनील तटकरे म्हणाले.

“छगन भुजबळ 1999 ते 2004 या काळाखंडात राज्याचे उपमुख्यमंत्री होते. नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसला 76 जागा आपण जिंकल्या होत्या. आघाडी आणि युतीत सर्वाधिक जागा असतात, त्याला मुख्यमंत्री करतात. संधी आलेली होती. पण छगन भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्ष फुटेल असं सांगण्यात आलं. विधीमंडळ पक्षात सिक्रेट झालं होतं. तुम्ही आकडेवारी त्यावेळी जाहीर केली नव्हती. विधीमंडळ पक्षासाठी मते मिळाली होती. छगन भुजबळांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर आमदार आपले वाढले असते”, असं मत सुनील तटकरे यांनी मांडलं.

‘तर आज मागे वळून बघावं लागलं नसतं’

“अजित दादा त्यावेळी नवखे होते. मी इतिहासाचा थोडा अभ्यासक आहे. तरूण मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांची इतिहासात नोंद झाली. अजित पवार 1999 ते 2004 मंत्री होते. पहिल्यांदा शरद पवारांना सात वर्षांचा अनुभव असताना शरद पवार मुख्यमंत्री होते. अजित पवार यांना सात वर्षांचा अनुभव होता. पण त्यांना मुख्यमंत्री केलं नाही. राष्ट्रवादीला संधी देवून मुख्यमंत्री पद घेतलं असतं तर आज मागे वळून बघावं लागलं नसतं”, असा दावा सुनील तटकरे यांनी केला.

‘तेच ठाकरे 2019 मध्ये आम्हाला मुख्यमंत्री चालले’

“2014 साली बाहेरून भाजपला पाठिंबा दिला. 2014 साली भाजपासोबत जाण्याची, 2009 साली शिवसेनेत जाण्याची चर्चा होती. 2014 साली भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी 16-16-16 जागांचा फॉम्युला ठरला होता. पण ते वर्कआऊट झालं नाही. 2016 साली भाजपसोबत त्यावेळी जाणार होतो. अंतिम निर्णय हा सरकारने शपथ कधी घ्यायची ठरवण्यासाठी आम्ही गेले होतो. उद्धव ठाकरेंची शिवसेना 2016 ला आम्हाला चालली नाही. तेच उद्धव ठाकरे 2019 मध्ये आम्हाला मुख्यमंत्री चालले”, असं सुनील तटकरे म्हणाले.

“अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय प्रवाहात सहभागी होण्याची भूमिका घेतली. 2019 साली राष्ट्रपती राजवट लावावी असं होतं. भाजप-शिवसेना महायुतीला बहुमत आलं होतं. उद्धव ठाकरेंना बहुमत देण्यात आलं होतं. महाविकास आघाडीचं सरकार आलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं”, असं तटकरे म्हणाले.

‘अजित पवारांच्या स्वाभिमानाला धक्का बसला’

“शरद पवारांचं अपमान करण्यात आला. काही घटना त्यावेळी घडल्या. अजित पवारांच्या स्वाभिमानाला धक्का बसला. त्यानंतर पहाटेचा शपथविधी झाला. नेहरू सेंटरमध्ये काय घडलं असं की स्वाभिमानाला धक्का लागला? एकनाथ शिंदे 2022 मध्ये गुवाहाटीत गेलेले होते. 53 आमदारांनी पत्र लिहून भाजपसोबत जाण्याचं ठरवलं. शरद पवारांना पत्र देण्यात आलं होतं. तीन जणांची समिती शरद पवारांनी बनवली होती. भाजपासोबत चर्चेसाठी समिती बनवण्यात आली होती”, असा दावा सुनीत तटकरे यांनी केला.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.