NCP Merger Update : विलिनीकरणाच्या चर्चेत आता नवा ट्विस्ट, तटकरेंनी सगळं सांगून विषय संपवला; मोठी खळबळ!

सुनिल तटकरे यांनी पुन्हा एकदा नव्याने विलिनीकरण होणार होते, असे बोलून दाखवले आहे. सोबतच विलिनीकरणाची प्रक्रिया नेमकी कधी पूर्ण होणार होती, याबाबतही त्यांनी सांगितलं.

NCP Merger Update : विलिनीकरणाच्या चर्चेत आता नवा ट्विस्ट, तटकरेंनी सगळं सांगून विषय संपवला; मोठी खळबळ!
sunil tatkare on ncp merger
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 06, 2026 | 10:04 PM

Sunil Tatkare on NCP Merger : सुनिल तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर महत्त्वाचं भाष्य केलंय. अजितदादा हयात असते तर आज दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र असते, असं मोठं विधान त्यांनी केलं. सोबतच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा झाली होती, असंही ते म्हणालेत. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटाकडून विलिनीकरणावर सकारात्मक भूमिका घेतली आहे. दरम्यान, तटकरेंच्या एका विधानाने राजकारणात चर्चांना पेव फुटल्याने आता त्यांनीच समोर येत विलिनीकरणाबाबत स्पष्टपणे सांगून टाकलंय. विलिनीकरण होणार की नाही, याबाबतही यांनी नेमकेपणानं सांगितलंय.

सुनिल तटकरे नेमकं काय म्हणाले?

विलिनीकरणावर भाष्य केल्यानंतर तटकरे यांनी पुन्हा एकदा रायगडमध्ये माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विलिनीकरण होणार नाही, असं सांगून टाकलंय. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा मुद्दा आता संपला आहे. सध्या कोणतीही चर्चा सुरू नाही,” असं स्पष्ट वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी केले.

Loading...

दादा असते तर राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते

पुढे बोलताना नात्र त्यांनी पुन्हा एकदा नव्याने विलिनीकरण होणार होते, असे बोलून दाखवले आहे. सोबतच विलिनीकरणाची प्रक्रिया नेमकी कधी पूर्ण होणार होती, याबाबतही त्यांनी सांगितलं. “दादा असते तर राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर प्रक्रिया पूर्ण होणार होती,” असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला.

भेटीचा राजकीय अर्थ काढू नका

खासदार शरद पवार यांची प्रकृती सध्या बरी नाही. त्यांना अनेक नेते भेटायला जात आहेत. खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही त्यांची भेट घेतली. यावर बोलताना, “शरद पवारांची प्रकृती विचारण्यासाठी भेट घेण्यात गैर काय? भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीचा विलिनीकरणाशी संबंध नाही,” असं तटकरेंनी स्पष्ट केलं. सोबतच, त्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us