AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंढे यांची कमाल, थेट 5 लाख रुपये नुकसान भरपाईचा आदेश रद्द, FDA ने..

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहेत. त्यांच्या कारवाईची चर्चा जगभरात होत आहे. त्यातच एका कारवाईनंतर नुकसान भरपाई 5 लाख रूपये देण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. त्यातच आता सर्वोच्च न्यायालयाने FDA ला मोठा दिलासा दिला.

तुकाराम मुंढे यांची कमाल, थेट 5 लाख रुपये नुकसान भरपाईचा आदेश रद्द, FDA ने..
Tukaram Mundhe
| Updated on: Oct 06, 2026 | 8:03 AM
Share

तुकाराम मुंढे यांच्या कामाची दखल जगाच्या पातळीवरून घेतली जात आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने विशेष दखल घेतली आहे. तुकाराम मुंढे यांच्या कामाबद्दल न्यूयॉर्क टाइम्सनेही लिहिण्यात आले. यासोबतच काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे अधिकारी तुकाराम मुंढे यांना भेटण्यासाठी एफडीएच्या कार्यालयात दाखल झाले होते.  अधिकारी तुकाराम मुंढे यांनी FDA ची सूत्रे हातात घेतल्यावर राज्यभर कारवाया सुरू केल्या आहेत. अनेक भेसळ खोरांवर त्यांनी कडक कारवाई केली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुंढे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक आव्हानांना सामोरे जातानाही सुशासनाचे तत्त्व कायम ठेवले. FDA च्या कारवाईविरोधात अनेकांनी कोर्टात धाव घेतली. काही केसमध्ये FDA च्या कारवाईवर कोर्टाने ताशेर देखील ओढले. ज्यानंतर तुकाराम मुंढे यांच्यावर टीकाही झाली.

त्यातच आता मोठी अपडेट पुढे येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने थेट FDA च्या कारवाईवर ताशेरे ओढत तुकाराम मुंढे यांना मोठा दणका दिला. त्यानंतर FDA ने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि निर्णय फिरवला. थेट तुकाराम मुंढे यांच्या विभागाने केलेली करवाई योग्यच असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. हेच नाही तर गुरुनानक डेअरी कारवाई प्रकरणातील सुप्रीम कोर्टाकडून नुकसानभरपाईचा आदेश रद्द करण्यात आला.

वडगाव शेरीतील गुरुनानक डेअरी अँड स्वीट्सवरील FDA कारवाई प्रकरण ही मोठी अपडेट आहे. अन्न विषबाधेच्या तक्रारीनंतर 12 जून रोजी FDA कडून तपासणी करण्यात आली. तपासणीत स्वच्छता, अभिलेख संधारण आणि लेबलिंगमध्ये त्रुटी आढळून आल्या. ज्यानंतर FDA कडून डेअरीचा परवाना निलंबित करण्यात आला होता, ही एक मोठी कारवाई करण्यात आली.

कारवाईविरोधात संबंधित व्यावसायिकाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने 17 ऑगस्टला परवाना निलंबनाचा आदेश उठवला. व्यवसायाचे नुकसान झाल्याने FDA ला पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. ज्यानंतर हा मोठा धक्काच FDA ला मानला जात होता. सर्वोच्च न्यायालयाने FDA ची कारवाई योग्य ठरवत पाच लाखांच्या नुकसानभरपाईचा आदेश रद्द केला.

Follow Us
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर