AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्राचा दावा, वातावरण तापलं, वडेट्टीवारांनी कोणाची सुपारी घेतली? शशिकांत शिंदेंचा सवाल

विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल मोठा दावा केला. सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, त्यावरून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे.

सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्राचा दावा, वातावरण तापलं, वडेट्टीवारांनी कोणाची सुपारी घेतली? शशिकांत शिंदेंचा सवाल
वडेट्टीवार यांच्या दाव्याने वातावरण तापलं Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 27, 2026 | 3:39 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे, यावरून वातावरण तापलेलं असतानाच काँग्रेसचे ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल मोठा दावा केला. सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच शरद पवार यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे की नाही? हे मला माहिती नाही, त्यावर मी बोलू शकत नाही. मात्र महाराष्ट्रातील अनेक बड्या मराठा नेत्यांकडे ओबीसीचं प्रमाणपत्र आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आमने-सामने आले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले शशिकांत शिंदे?

शशिकांत शिंदे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मित्र पक्षांना संपवण्यापेक्षा त्यांच्यासोबत काम करणं गरजेचं आहे. 2014 ला काँग्रेसमुळे सत्ता गेली. आम्ही महायुतीमध्ये जाण्याची चर्चा आहे, मात्र आम्ही महायुतीमध्ये गेलो का? आम्ही आहे तिथेच आहोत, मग आम्हाला टार्गेट का केलं जात आहे. विजय वडेट्टीवार यांना कुठून पुरावे मिळाले? ते त्यांनी सांगावं, अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी यावेळी केली आहे. तसेच वडेट्टीवार यांनी कोणाची सुपारी घेतली हे त्यांनी सांगावं, मित्राची गरज काँग्रेसला वाटत नाही का? सुप्रिया सुळे यांच्याबद्दल चुकीचे आरोप सहन करणार नाही, असा इशाराही यावेळी शिंदे यांनी दिला आहे.

वडेट्टीवारांनी मागितली माफी

दरम्यान त्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.  सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता, असे ते म्हणाले. तसेच माझा ओबीसींसाठीचा लढा मात्र सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. वडेट्टीवार यांच्या या दाव्यामुळे मात्र वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं, मात्र त्यावर आता वडेट्टीवार यांच्या माफीनंतर पडदा पडण्याची शक्यता आहे.

Follow Us
सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतु नव्हता, वडेट्टीवारांची दिलगीरी
सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतु नव्हता, विजय वडेट्टीवारांची दिलगीरी
सतेज पाटील आणि भाजप समर्थक शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
सतेज पाटील आणि भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी...
आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी बड्या नेत्याचा मोठा दावा
जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक
Nepal Flood : जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक VIDEO
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; भीषण अपघात...
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; कानपूरमध्ये विमानाचा भीषण अपघात
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारताची तयारी...
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारत मोठ्या तयारीत, आता...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट लिहिलं, एक खोका...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट... नवा नियम काय?
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी...
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी यांच्यात राजकीय संघर्ष
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?