UPSC चा पेपर कधी फुटत नाही, मग….; नीट पेपरफुटीवरून सुप्रिया सुळेंची मोठी मागणी

Supriya sule : सुप्रिया सुळे यांनी पेपरफुटीवरून सरकारला अनेक सवाल उपस्थित केले आहे. तसेच सरकारवर निशाणाही साधला आहे.

UPSC चा पेपर कधी फुटत नाही, मग....; नीट पेपरफुटीवरून सुप्रिया सुळेंची मोठी मागणी
| Updated on: Aug 01, 2026 | 10:56 AM

नीट पेपरफुटीवरून अद्याप सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालं. त्यानंतरही विरोधकांकडून केली जात आहे. सुप्रिया सुळे यांनीही परीक्षा सुधारणा विधेयकाला नापंसती दर्शवली आहे. देशात UPSC चा पेपर कधी फुटत नाही, मग नीटचा पेपर कसा फुटतो? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला केला आहे. या नीट पेपरफुटीची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी मुंबईत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. त्यानंतर नीट पेपरफुटीवर भाष्य करताना सुळे यांनी म्हटलं की, ‘ नीट प्रकरणाची पारदर्शक चौकशी झाली आहे. यासाठी एक एसआयटी स्थापन करा. सर्व पक्षीय बैठक किंवा संयुक्त संसदीय समिती स्थापन करता येते. भारताचे शिक्षण पुढे कसं असावं? UPSC ची परीक्षा होते. त्याचा पेपर कधी फुटतो का? UPSC चा पेपर फुटत नाही. पण नीटचा पेपर फुटतो.

‘खरंतर अनेक कोचिंग क्लासेस असे आहेत, त्यांचे आयपीओ येत आहेत. ऐवढा पैसा त्यांच्याकडे झाला आहे. ते मोठा व्यवसायक करून त्यांचा सार्वजनिक कंपन्यांच्या यादीत समावेश होत आहे. हे धक्कादायक आहे.. शिक्षणाचं बाजारीकरण झालं आहे. आता शिक्षण व्यवस्थेवर आम्ही चर्चा करायची नाही, तर कोणी करायची. संसद भवन त्याच्यासाठीच आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून तरुणांना न्याय मिळावा, परीक्षा पारदर्शक व्हावी. जगात परीक्षा होतात, तिथे कसा पेपर फुटत नाही. आपल्याच इथे कसा पेपर फुटतो, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला.

‘आधार कार्डचा चांगला कार्यक्रम हा काँग्रेस-यूपीए सरकारच्या काळात झाला. त्यामुळे प्रत्येकाला आधार मिळाला. मग ते पारदर्शक होऊ शकते. तर नीटचा पेपर होऊ शकत नाही. आता बिल आणलं, त्यात मी समाधानी नाही. राष्ट्रवादी काँग्रेसही नाही. इंडिया आघाडी देखील नाही. राजकारणी नव्हे, तर पालक म्हणूनही मी समाधानी नाही. या प्रकरणात शिक्षा होऊन फायदा नाही. तुम्ही पेपरफुटी थांबवल्या पाहिजे. एखाद्याने तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून पेपर फोडला, तर त्याच्यावर प्रशासन कोणाचं असेल. हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्यावे. पहलगामवेळी देशहितासाठी एक झाले. विरोधी पक्षाला विश्वासात घ्यावे. अश्रूधूरांच्या नळकांड्या फोडल्या. त्याचा आवाज आम्हाला संसदेत ऐकू येत होते. कुटुंबाचा विचार करा. जंतरमंतरवर लाईव्ह करत होते. मुलांशी प्रेमाने कोणी बोललं असतं, तर प्रश्न सुटला नसता का? असा सवालही सुळेंनी सरकारला विचारला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us