PM मोदींच्या व्हिडिओ संदेशावरून उडाला राजकीय भडका; विरोधी पक्षाच्या नेत्याचा जिव्हारी लागणारा वार, कोण काय म्हणालं?
पंतप्रधान मोदी यांच्या इन्स्टाग्राम व्हिडिओरून राजकीय रणकंदन सुरू झालं आहे. या व्हिडिओवरून विरोधकांनी मोदींवर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर Gen-Z साठी एक व्हिडिओ संदेश पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये मी मुलांना माफ करू इच्छित आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या व्हिडिओ संदेशावरून राजकारण तापलं आहे. मोदींच्या विधानानंतर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले आहेत. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी जोरदार पलटवार केला आहे.
PM मोदींकडून आंदोलक मुलांना माफी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी शुक्रवारी रात्री जवळपास 11 वाजता Gen-Z ला संबोधित केलं. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ शेअर करून तरुणांना संदेश दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या मुलांनी मला आणि माझ्या दिवंगत आईविषयी अपशब्द वापरले. त्यांची कृती धक्कादायक आहे. खरंतर आता मार्ग चुकलेल्या तरुणांना गळाभेट घेऊन मार्ग दाखवण्याची वेळ आहे. मी या मुलांना माफ करू इच्छित आहे’.
विरोधकांडून PM मोदींवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) संदेशावरून चांगलच राजकारण पेटलं आहे. काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि इतर पक्षाने पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून टीका केली आहे. ‘पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, कोणाच्याही आई विरोधात अपशब्दाचा वापर करू नये. परंतु भाजपचे नेते असेच करताना दिसतात. भाजप नेत्यांनी महात्मा गांधी, सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीशांच्या विरोधातही अपशब्दांचा वापर केला आहे’.
सत्ताधारी नेत्यांकडून PM मोदींच्या विधानाचं कौतुक
तत्पूर्वी, सत्ताधाऱ्यांनी पंतप्रधान मोदींच्या विधानाचं स्वागत केलं. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या विधानाचं कौतुक केलं. केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदेशाचे स्वागत केलं. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचं समर्थन केलं. ‘मुलांच्या हातून चूक घडू शकते. परंतु त्यांना शिक्षा देण्याऐवजी चांगला मार्ग दाखवला पाहिजे, असे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटलं.
