AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणातील CBI तपासावर सुशांतचा भाऊ स्पष्टच बोलला..

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणाचा सध्या सीबीआयकडून तपास सुरू आहे. याप्रकरणी आता दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या चुलत भावाने प्रतिक्रिया दिली आहे. आता न्याय मिळेल असं वाटतंय, असं त्याने म्हटलंय.

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणातील CBI तपासावर सुशांतचा भाऊ स्पष्टच बोलला..
Disha Salian and Sushant Singh RajputImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 22, 2026 | 9:48 AM
Share

दिशा सालियान प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळं वळण मिळालं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) दिशा सालियन प्रकरणाची नव्याने चौकशी सुरू केली आहे. या घडामोडीनंतर सुशांतच्या कुटुंबीयांकडूनही प्रतिक्रिया समोर येत आहेत. सुशांतचा चुलत भाऊ पन्ना सिंह यांनी या निर्णयाचं स्वागत करत, ‘आता तरी आम्हाला न्याय मिळेल’, अशी आशा व्यक्त केली आहे. दिशा सालियन ही सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर होती. दिशा सालियान आणि सुशांत सिंह या दोघांच्या घटनांमध्ये काही संबंध आहे का, याबाबत गेल्या काही वर्षांपासून विविध दावे आणि चर्चा होत आहेत.

आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर CBI ने दिशा सालियन प्रकरणात FIR दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. या तपासामध्ये आधी झालेल्या चौकशीतील कागदपत्रे, पोलिसांचे रेकॉर्ड, फॉरेन्सिक आणि पोस्टमॉर्टेमशी संबंधित माहिती तसंच घटनास्थळाशी निगडित बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. याशिवाय त्या रात्री दिशा ज्या ठिकाणी होती, तिथे उपस्थित असलेल्या काही व्यक्तींचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

सुशांतचा चुलत भाऊ पन्ना सिंह यांनी बिहारमधील पूर्णिया इथं या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं सांगितलं. नव्या तपासामुळे सत्य समोर येईल आणि कुटुंबाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांनी सुशांत प्रकरणाबाबत गंभीर दावेही केले आहेत. सुशांतचा चुलत भाऊ आणि माजी बिहार मंत्री नीरज कुमार सिंह बबलू यांनीही या तपासामुळे आशा निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. सुशांतच्या कुटुंबीयांसह त्याचे चाहतेही या नव्या तपासाकडे लक्ष ठेवून आहेत. सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्ती हिनेही सोशल मीडिया पोस्टद्वारे नव्या चौकशीचं स्वागत करत सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

दरम्यान, CBI च्या एफआयआरमध्ये विविध आरोपांचा तपास करण्याची तरतूद आहे. CBI नेही तपासादरम्यान पुरावे मिळाल्याशिवाय कोणालाही आरोपी म्हणून घोषित करू नये, असा उच्च न्यायालयाचा निर्देश आहे. त्यामुळे आता CBIच्या तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते, जुन्या तपासातील प्रश्नांची उत्तरं मिळतात का आणि दिशा सालियनच्या प्रकरणाचं गूढ उकलतं का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत्रांबाबत नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट..
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट कारवाई