AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HPV लसीकरणानंतर १६ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू, पालकांनी केला आरोप

दरम्यान, या घटनेनंतर या संपूर्ण आरोग्य विभागात ॲक्शन मोडवर आला आहे. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत संपूर्ण लसीकरण मोहीम देखील थांबवण्यात आली आहे. त्यामुळे नेमकं आता मृत्यूचे कारण अहवालातुन काय येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

HPV लसीकरणानंतर १६ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू, पालकांनी केला आरोप
death after vaccination ?
| Updated on: Jun 25, 2026 | 9:00 PM
Share

नाशिकमध्ये लसीकरणानंतर १६ वर्षीय श्रावणी पाटील या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. खुटवडनगर येथील लसीकरण शिबिरात एचपीव्ही प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही मिनिटांतच ती बेशुद्ध पडल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात लसीकरणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. दुसरीकडे, मृत्यूचे नेमके कारण फॉरेन्सिक आणि वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

नाशिकच्या खुटवडनगर येथील लसीकरण शिबिरात १६ वर्षीय श्रावणी पाटील हिने HPV  लस घेतली होती. लस घेतल्यानंतर काही मिनिटांतच ती बेशुद्ध पडल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. तिला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. लसीकरणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. प्रशासन सत्य लपवत असल्याचाही आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

दहा लाखात एखाद्या व्यक्तीला रिएक्शन

या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक आणि वैद्यकीय तपासणी अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. चौकशीसाठी विशेष वैद्यकीय पथक नाशिकमध्ये येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.राज्यभर लसीकरण मोहीम राबवणाऱ्या विभागाचे वरिष्ठ अधिकारीही या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. दहा लाख लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीला लसीनंतर गंभीर रिएक्शन येऊ शकते, असा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे आरोग्य विभागाचे उपसंचालक कपिल आहेर यांनी सांगितले.

HPV लस नेमकी कशासाठी दिली जाते ?

HPV लस (Human Papillomavirus Vaccine) ही लस प्रामुख्याने गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) आणि HPV (ह्युमन पॅपिलोमाव्हायरस) मुळे होणाऱ्या इतर कर्करोगांपासून बचावासाठी दिले जाते. HPV लसीमुळे गर्भाशयाचा कर्करोग, गुदद्वाराचा कर्करोग आणि घशाचा कर्करोग यापासून बचाव होतो.

लसीकरण मोहीम थांबवली

दरम्यान, या घटनेनंतर या संपूर्ण आरोग्य विभागात ॲक्शन मोडवर आला आहे या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत संपूर्ण लसीकरण मोहीम देखील थांबवण्यात आली आहे. त्यामुळे नेमकं आता मृत्यूचे कारण अहवालातुन काय येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

Follow Us
आंदोलक म्हणजे आतंकवादी! खोतांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं
Sadabhau Khot | आंदोलक म्हणजे आतंकवादी! सदाभाऊ खोतांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं
दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीतील CJP च्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, आंदोलनांसारख्या संवेदनशील...
ठाकरे गटाचा मोठा डाव! सर्व फुटीर खासदारांना कोर्टात ओढणार, नेमकं काय..
ठाकरे गटाचा मोठा डाव! सर्व फुटीर खासदारांना कोर्टात ओढणार, नेमकं काय घडलं?
देशात लोकशाही उरली कि निव्वळ...अमित ठाकरे यांचा ट्विट करत सरकारला सवाल
Amit Thackeray | देशात लोकशाही उरली कि निव्वळ दडपशाही सुरु आहे? अमित ठाकरे यांचा ट्विट करत सरकारला संतप्त सवाल
अमेरिकेसोबतच्या 'त्या' करारामुळे प्रकरण पेटलं! हजारो शेतकरी रस्त्यावर,
अमेरिकेसोबतच्या 'त्या' करारामुळे प्रकरण पेटलं! हजारो शेतकरी रस्त्यावर, दिल्लीत मोठ्या हालचाली?
पैसा द्या, पेपर घ्या? धर्मेंद्र प्रधानांवर AI व्हिडीओ ट्विट करत....
पैसा द्या, पेपर घ्या? धर्मेंद्र प्रधानांवर AI व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
12 वर्षांच्या मुलींचं डोकं फोडलं... दिल्ली पोलिसांवर दीपकेंचे आरोप
Abhijit Dipke | 12 वर्षांच्या मुलींचं डोकं फोडलं, कपडे फाडले... दिल्ली पोलिसांवर अभिजित दीपकेंचे गंभीर आरोप
जालियनवाला बागची आठवण करून देत राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
Sanjay Raut | 20 जुलै हा ब्लॅक डे! जालियनवाला बागची आठवण करून देत संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
डायर नाही, कायर पाहिला! लाठीचार्जवर देशपांडेंचा सरकारवर घणाघाती हल्ला
Sandeep Deshpande | जनरल डायर नाही, कायर पाहिला! विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर संदीप देशपांडेंचा सरकारवर घणाघाती हल्ला
युवा पिढी हीच लोकशाहीची ताकद; CJP आंदोलनाला रितेश-जेनेलियाचा पाठिंबा!
Ritesh-Genelia Deshmukh | युवा पिढी हीच लोकशाहीची ताकद; CJP आंदोलनाला रितेश-जेनेलियाचा पाठिंबा! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधी यांची मागणी...

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधी यांची मागणी..

Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO.

Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO

Mallikarjun Kharge: हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल.

Mallikarjun Kharge: हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल

या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याने संताप, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचे आवाहन.

या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याने संताप, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचे आवाहन

मध्यरात्री बायकोला संपवलं, 1 वर्षाची मुलगी आणि 3 मांजराच्या पिल्लांनाही सोडलं नाही, सोलापूर हादरलं.

मध्यरात्री बायकोला संपवलं, 1 वर्षाची मुलगी आणि 3 मांजराच्या पिल्लांनाही सोडलं नाही, सोलापूर हादरलं

PM Modi : राजधानीत विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले असताना पंतप्रधान मोदींची नीट पेपर लीक प्रकरणात पहिली मोठी प्रतिक्रिया.

PM Modi : राजधानीत विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले असताना पंतप्रधान मोदींची नीट पेपर लीक प्रकरणात पहिली मोठी प्रतिक्रिया