AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पप्पा, बघा तुम्ही म्हणत होता, जाऊ नको, पण मी गड चढला… असं म्हणताच श्रावणी कोसळली; सहलीसाठी गेलेल्या मुलीचा सज्जनगडावर मृत्यू

करमाळ्यातील १६ वर्षीय श्रावणी लिमकर हिने आई-वडिलांच्या विरोधाला न जुमानता सज्जनगड चढण्याचा निर्णय घेतला. जन्मजात हृदयविकार असल्याने डॉक्टरांनी तिला अशा शारीरिक मेहनतीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. तरीही ती शाळेच्या सहलीला गेली आणि गड चढली. गडावर पोहोचल्यानंतर तिला धाप लागली आणि ती खाली कोसळली. तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पप्पा, बघा तुम्ही म्हणत होता, जाऊ नको, पण मी गड चढला... असं म्हणताच श्रावणी कोसळली; सहलीसाठी गेलेल्या मुलीचा सज्जनगडावर मृत्यू
| Updated on: Jul 29, 2025 | 12:43 PM
Share

आई-वडिलांच्या विरोधाला न जुमानता सज्जनगड चढून गेलेल्या अवघ्या 16 वर्षांच्या मुलीचा तिथेच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. करमाळा शहरातील श्रावणी राहुल लिमकर (वय 16) या मुलीच्या अकाली मृत्यूनवे हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सज्जनगड, सातारा यथे हा प्रकार घडल्याचे समोर आले असून तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अखेर शोकाकुल वातावरणामध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

“पप्पा, बघा तुम्ही म्हणत होता, जाऊ नको, पण मी गड चढला…

याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की श्रावणी राहुल लिमकर ही 16 वर्षांची मुलगी करमाळ्यात इयत्ता 10वीमध्ये शिकत होती. तिच्या हृदयाला जन्मताच छिद्र होते आणि त्यावरच उपचार सुरू होते. मात्र तिची नीट काळजी घ्या, खहरदारी घ्यावी असा इशारा डॉक्टरांनी सांगितलं होतं. रविवार 27 जुलै रोजी तिच्या क्लासमधील मुला-मुलींची सहल सज्जनगड येथे गेली होती. मात्र श्रावणीला धाप लागत असल्याने तिचे आई-वडील तिला सहलीला पाठवत नव्हते.

पण मी गड चढणार नाही , मला कास पठार पहायचं आह असे सांगत श्रावणीने तिच्या पालकांकडे सहलीला जायची परमिशन मागितली. अखर श्रावणी ही करमाळा येथील खाजगी शिकवणी घेत असलेल्या शहाणे क्लासेस मधील अकरा विद्यार्थी- विद्यार्थिनी व शिक्षकांसह खाजगी वाहनाने सहलीला गेली होती.

गडावर गेली आणि घेतला अखेरचा श्वास

तिथे जऊन सर्व मुला-मुलींसोबत श्रावणी सज्जनगड चढली, मात्र गड चढल्यानंतर श्रावणीला थोडी धाप लागली, परंतु आपण हृदयाने कमजोर असताना देखील गडावर पोहचल्याचा आनंद झाला. अखेर तिने तिच्या वडिलांना मोबाईलवर फोन केला आणि “पप्पा, बघा तुम्ही म्हणत होता, जाऊ नको, पण मी गड चढला” अस तिने वडिलांना आनंदाने सांगितलं. मात्र तेवढ्यात ती खाली कोसळली. ते पाहून तिच्यासोबत असलेल्या मुलींनी तिला आधार देत गडाच्या खाली आणले व तिला तातडीने साताऱ्यातील खाजगी रुग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाचा श्रावणीचा मृत्यू झाला. अखेर तिच्यावर शोकाकुल वातावरणात सोमवारी सकाळी करमाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई-वडील, आजी आजोबा, तीन बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.