Health: देशात एकाच दिवसात होणार 10 लाख रक्त शर्करा चाचणी, औरंगाबादमध्ये 25 केंद्रांवर मोफत सुविधा

Health: देशात एकाच दिवसात होणार 10 लाख रक्त शर्करा चाचणी,  औरंगाबादमध्ये 25 केंद्रांवर मोफत सुविधा
औरंगाबादेत बुधवारी 45 केंद्रांवर निःशुल्क रक्तशर्करा तपासणी

औरंगाबाद: मधुमेहाचे माहेरघर अशी कुख्याती मिळवलेल्या भारतात आता मधुमेहासंदर्भात (Diabetes) मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. मधुमेह आजारा संदर्भात व्यापक प्रमाणात काम करणाऱ्या रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबेटिस इन इंडिया’ (RSSDI) या संघटनेच्या वतीने देशभरात विविध उपक्रम हाती घेतले जात असतात. यंदा ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ साठी बुधवारी 29 सप्टेंबर रोजी देशभरात संघटनेच्या वतीने एकाच दिवशी 10 लाख रक्तशर्करा (Bloosugar Level) तपासणी निःशुल्क पद्धतीने करण्यात येणार आहे. बुधवारी शहरातील पंचवीस केंद्रांवर ही तपासणी होणार आहे.

टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीटचा महत्त्वपूर्ण संदेश

1 जुलैपासून पुढचे शंभर दिवस (RSSDI) या देशपातळीवर मधुमेह तज्ज्ञांच्या संघटनेतर्फे डिफीट डायबेटिस हा उपक्रम देशभरात राबवण्यात येत आहे. याद्वारे आतापर्यंत सुमारे 12 कोटी व्यक्तींपर्यंत टेस्ट म्हणजेच नियमितपणे रक्तातील साखरेची तपासणी करा, ट्रॅक म्हणजेच मधुमेह असेल तर त्यावर लक्ष ठेवा आणि ट्रीट म्हणजे मधुमेह नियंत्रणात ठेवा, हा संदेश पोहोचवण्यात आला. आता बुधवारी देशातील जास्तीत जास्त लोकांची रक्तशर्करा चाचणी करण्याचा निश्चय संघटनेमार्फत करण्यात आला आहे. याद्वारे एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्नही केला जाणार आहे.यासाठी रोटरी क्लब, टोरंट फार्मा, आर्ट ऑफ लिव्हिंग आदी संस्था पुढे आल्या आहेत. विशेष म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री रविशंकर यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

कोरानमुळे मर्यादीत व्यक्तींनाच केंद्रात प्रवेश

या उपक्रमाअंतर्हत शहरातील पंचवीस केंद्रांमध्ये चाचणी करण्यात येईल.  कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन होण्याची हमी घेतली जाईल. एका वेळी मर्यादित व्यक्तींनाच केंद्रात प्रवेश दिला जाईल. तसेच लसीकरण झालेल्या व पूर्वनोंदणी केलेल्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन RSSDI चे अध्यक्ष व मधुमेहतज्ज्ञ डॉ. मयुरा काळे, आयएमएचे शहर अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर, सचिव डॉ. यशवंत गाडे, रोटरी क्लबच्या ज्योती काथार, डॉ. अनिता देशपांडे, डॉ. राजीव मुंदडा, चंद्रकांत चौधरी, ईश्वर हॉस्पिटलचे डॉ. अभिमन्यू माकणे यांनी केले आहे.

शहरात कोणत्या केंद्रांवर तपासणी?

शहरात डॉ. मयुरा काळे (गोकुळ स्वीट कॉर्नर, एन-चार), ईश्वर हॉस्पिटल (पडेगाव), डॉ. मयूर भोसले- डिटेक्ट लॅब रिलायन्स मॉल्स, चंद्रकांत चौधरी- भेंडळा ग्रामपंचायत, ज्योती काथार- रोटरी क्लब मिडटाउन, राहुल- रोटरी क्लब औरंगाबाद सेंट्रल, डॉ. अहेसान शेख- शहागंज, डॉ. रंजना देशमुख- हेडगेवार रुग्णालय, डॉ. संजय देवरे- मेडिचेक पॅथॉलॉजी, लॅबोरेटरी, बंजारा कॉलनी चौक, शिवाजी हायस्कूल रोड, डॉ. प्रमोद सरवदे- ज्युबली पार्क- डॉ. दीपक केंद्रे- एन 2 सिडको, डॉ. सुवर्णा निकम- ग्रामीण रुग्णालय- करमाड, डॉ. प्रशांत चौधरी- मृत्यूंजय क्लिनीक सिडको, डॉ. विशाल ठाकरे- साई-मेडिसिटी हॉस्पिटल आणि आयसीयू, एन 11 जळगाव रोड येथे सकाळी साडे सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत. डॉ. पी. एस. पाटणी (त्यागी भवन, नेर जैन मंदिर, अरिहंतनगर), डॉ. जबीन पटेल- पडेगाव, डॉ. संमती ठोळे- राजा बाजार, डॉ. अनंत कडेठाणकर – उल्कानगरी, डॉ. श्रद्धा परळीकर- एन-पाच, डॉ. गीतेश दळवी- चैतन्य नगर, गारखेडा, डॉ. ज्ञानेश्वर गजभारे -सिंधी कॉलनी, डॉ. निलेश लोमटे- दूध डेअरी सिग्नल, डॉ. अर्चना सारडा- स्टेपिंग स्टोन हायस्कूल, डॉ. नितीन संचेती- जवाहर कॉलनी, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, घाटी मेडिसीन ओपीडी येथे सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत ही चाचणी उपलब्ध असेल.

इतर बातम्या- 

Health Tips | मधुमेहाच्या रुग्णांनी रोज प्यावा ‘या’ 5 प्रकारचा चहा, रक्तातील साखर राहील नियंत्रणात!

Health Care : कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी आहारात या मसाल्यांचा समावेश करा!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI