AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात म्युकर मायकोसिसच्या 5 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया; डॉक्टरांच्या टीमला मोठं यश

राज्यात म्युकर मायकोसिसमुळे डोळे जाण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. (thane civic hospital Successfully Treated five Mucormycosis patients in thane)

ठाण्यात म्युकर मायकोसिसच्या 5 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया; डॉक्टरांच्या टीमला मोठं यश
नाशिकमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढला
| Updated on: May 19, 2021 | 7:35 PM
Share

ठाणे: राज्यात म्युकर मायकोसिसमुळे डोळे जाण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ठाण्यातही म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, ठाण्यातील म्युकर मायकोसिसच्या पाच रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. त्यामुळे म्युकर मायकोसिसचे लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता उपचार करून घ्यावेत, असं आवाहन ठाणे पालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केलं आहे. (thane civic hospital Successfully Treated five Mucormycosis patients in thane)

कोरोना झाल्यानंतर म्युकर मायकोसिस या नवीन बुरशीजन्य रोगाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. परंतु वेळेत योग्य उपचार घेतल्यास म्युकर मायकोसिस पूर्ण बरा करू शकतो. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने हे शक्य करून दाखवले आहे. 5 म्युकर मायकोसिस रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांच्या टीमला यश आले आहे, असं पालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी सांगितलं.

ग्लोबल रुग्णालयातील रुग्ण

ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयाकडून म्युकर मायकोसिसचे हे 5 रुग्ण छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाकडे पाठवण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाने तात्काळ या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जून ते ऑगस्ट महिन्यात 2 रुग्णांवर तर दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत 3 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून योग्य उपचारांनंतर सर्व रुग्ण सुखरूप घरी परतले आहेत.

चार डॉक्टरांची टीम

म्युकर मायकोसिसच्या उपचार पद्धतीसाठी डेन्टिस्ट, ईएनटी सर्जन आणि आय स्पेशालिस्ट, भूलतज्ज्ञ अशा डॉक्टरांच्या एकत्रित टीमने या सर्व शस्त्रक्रिया केल्या आहेत. यामध्ये मेडिसीन विभागाचे डॉ. योगेश शर्मा, डॉ. सुमन राठोड, शस्त्रक्रिया विभागाच्या डॉ. श्वेता बाविस्कर तसेच डॉ. अमोल खळे या तज्ज्ञ डॉक्टर्सचा समावेश आहे. (thane civic hospital Successfully Treated five Mucormycosis patients in thane)

संबंधित बातम्या:

‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांना मोठा दिलासा, उपचाराचा सर्व खर्च म. फुले जनआरोग्य योजनेतून होणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

ठाकरे मंत्रिमंडळाने घेतले चार महत्त्वाचे निर्णय; आता ग्रामसेवकांनाही ‘एवढा’ दरमहा प्रवासी भत्ता मिळणार

गुजरातला एक हजार कोटींचं पॅकेज, वादळात दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख; मोदींची मोठी घोषणा

(thane civic hospital Successfully Treated five Mucormycosis patients in thane)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.