AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Crime : मित्रानेच केला मित्राचा घात, वाढदिवसाचा केक ठरला कारणीभूत !

मित्रच मित्राच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. छोट्याशा कारणामुळे त्याने स्वत:च्या मित्राचाच घात केल्याचे समोर आले आहे.आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे कुटुंबियांनी सांगितले.

Thane Crime : मित्रानेच केला मित्राचा घात, वाढदिवसाचा केक ठरला कारणीभूत !
| Updated on: Oct 11, 2023 | 9:15 AM
Share

उल्हासनगर | 11 ऑक्टोबर 2023 : जीवाला जीव देणारे, प्रसंगी पाठिशी ठामपणे उभ राहणारे, आपल्याच आनंदात डबल खुश होणारे मित्र हे आयुष्यातील अनमोल ठेवा असतात. जे प्रॉब्लेम्स किंवा सीक्रेट आपण आपल्या कुटुंबियांशी पण शेअर करू शकत नाही ते आपण मित्रांना बिनधास्त सांगू शकतो, मनमोकळं बोलू शकतो. हेच मित्र शेवटपर्यंत साथ देतात. आपलं दु:ख वाटून कमी करतात आणि आनंदांची गोष्टी सेलिब्रेट करून तो आनंद वाढवतात.

प्रत्येकालाच असे मित्र मिळतात असं नाही, पण ज्यांना असे जीवश्चकंठश्च मित्र मिळतात, त्यांनी ते नक्की जपून ठेवावेत. कारण आयुष्यात बाकी काहीच नसलं तरी अर्ध्या रात्री फोन करून बडबड ऐकणारे आणि मदतीला धावून येणारे मित्रच आयुष्यातील महत्वाची ठेव असतात. पण काही मित्र असे असतात, जे असण्यापेक्षा शत्रूच परवडतात. स्वत:च्या रागापायी, शुल्लक गोष्ट मनात ठेवून अबोला धरणारे किंवा सर्वात वाईट म्हणजे याच रागातून तुमचं वाईट चिंतणारे दोस्त दुश्मनांपेक्षा कमी नसतात.

दोस्तीचा असाच एक वाईट शेवट उल्हासनगरमध्ये (crime news) घडला. तेथील कॅम्प 2 मधील खेमानी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मित्रानेच मित्राचा घात करत त्याचा काटा काढल्याचा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. जेवण करून घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या पोटात चाकू (man stabbed) खुपसल्याने एक तरूण जखमी झाला होता, त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. मात्र त्याच्या मृत्यूस त्याचा मित्रच जबाबदार ठरला

वाढदिवसाला गेला नाही म्हणूनन…..

उल्हासनगर कॅम्प २ मधील खेमानी परिसरातील राहणारा प्रदीप वर्मा हा तरूण 26 सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास जेवणानंतर बाहेर शतपावली करायला बाहेर पडला. मात्र तेवढ्यात एका अल्पवयीन तरूणाने त्याच्या पोटात चाकू खुपसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. उपचारांसाठी त्याला तातडीने उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या १३ दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता, मात्र त्याची ही लढाई अखेर थांबली. उपचारांदरम्यान प्रदीप याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिली.

आमचा मुलगा, प्रदीप याच्या एका मित्राचा वाढदिवस होता, जवळच्या चौकात वाढदिवसानिमित्त केक कापण्यात येणार होता. मात्र प्रदीप हा त्यावेळी तिथे गेला नाही, हाच राग मनात ठेवून दोन अल्पवयीन मुलांनी आमच्या मुलाची हत्या केली, असा आरोपी प्रदीपच्या कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणात अद्याप एकालाच ताब्यात घेतले आहे मात्र या खुनामागे आणखी कोणाचा हात आहे, ते शोधून इतर आरोपींनाही अटक करावी, त्याशिवाय आम्ही मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा वर्मा यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.