जितेंद्र आव्हाडांकडून ठाण्यातील पोलीस वसाहतींचा प्रश्न निकाली, पोलिसांना 567 घरं मिळणार

जितेंद्र आव्हाडांकडून ठाण्यातील पोलीस वसाहतींचा प्रश्न निकाली, पोलिसांना 567 घरं मिळणार

वर्तक नगर येथील पोलीस वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी अवघ्या एकाच बैठकीत निकाली काढला आहे. (Thane Police Colony Re-develop by MHADA) 

Namrata Patil

|

Sep 15, 2020 | 8:31 PM

ठाणे : ठाण्यातील वर्तकनगर मधील पोलीस वसाहतीचा प्रश्न अखेरीस मार्गी लागला आहे. पोलिस वसाहतीच्या सर्व इमारतीचा पुनर्विकास म्हाडा करणार असा निर्णय बैठकीत पार पडला. या बैठकीला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक तसेच सचिव, गृहसचिव आणि म्हाडाचे मुख्य अधिकारी उपस्थित होते. (Thane Police Colony Re-develop by MHADA)

गेली अनेक वर्षे रखडलेला वर्तक नगर येथील पोलीस वसाहतीच्या पुनर्वसनाचा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी अवघ्या एकाच बैठकीत निकाली काढला आहे. या वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या ठिकाणी सुमारे 567 घरे ही पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

तर उर्वरित घरे सोडतीद्वारे म्हाडाकडून वितरीत करण्यात येणार आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न आव्हाड यांनी तत्काळ मार्गी लावला आहे. त्यामुळे सबंध पोलीस दलातून आव्हाड यांचे आभार मानले जात आहेत.

1973 मध्ये म्हाडा ठाणे पोलिस आयुक्तालयाला 856 सदनिका हस्तांतरित केल्या होत्या. पण त्यानंतर गेल्या 46 वर्षांमध्ये योग्य प्रकारे इमारतींची देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे या सर्व इमारती धोकादायक झाल्या आहेत. त्यापैकी काही इमारती अतिधोकादायक झाल्याने पाडण्यात आल्या आहेत. तर, उर्वरित इमारतींमध्ये आजी-माजी पोलिसांची कुटुंब जीव मुठीत धरून जगत आहेत. काही पोलीस कुटुंबांना रेंटल हाऊसिंग योजनेत स्थलांतरित करण्यात आले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस सरकारच्या काळात चार एफएसआय मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्यापुढे कोणत्याही हालचाली झाल्या नव्हत्या. जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर हा प्रश्न आल्यानंतर त्यांनी मंगळवारी गृहनिर्माण खात्याच्या वतीने तत्काळ एका बैठकीचे आयोजन केले.

या बैठकीला स्थानिक आमदार प्रताप सरनाईक, अप्पर मुख्य सचिव (गृह) सिताराम कुंटे, गृहनिर्माणचे प्रधान सचिव श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर इत्यादी उपस्थित होते. (Thane Police Colony Re-develop by MHADA)

संबंधित बातम्या : 

महिलांकरिता विशेष बससेवा उपलब्ध करावी, यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रुग्णासोबत आलेल्या व्यक्तीला मास्क घालण्याची विनंती, नागपुरात डॉक्टरांना मारहाण

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें