AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसाऱ्यात द बर्निंग ट्रेनच्या थरारने प्रवाशांची तारांबळ; धावत्या लोकला आग, धूर निघाला अन्…

या घटनेमुळे अप व डाऊन मार्गावरील लोकल वाहतूक 15 मिनिटे उशिराने धावत आहे. त्यामुळे या मार्गावरील इतर रेल्वे स्थानकामध्ये मोठी गर्दी झाली आहे. गर्दीमुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत.

कसाऱ्यात द बर्निंग ट्रेनच्या थरारने प्रवाशांची तारांबळ; धावत्या लोकला आग, धूर निघाला अन्...
local trainImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 16, 2023 | 11:21 AM
Share

कसारा: कसारा येथे आज सकाळी सकाळी जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावं लागलं. कसाऱ्यात चालत्या लोकल ट्रेनमधून अचानक धूर निघून आग लागल्याने प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. भर गर्दीच्या वेळी ही आग लागल्याने प्रवाशांच्या तोंडचं पाणी पळालं. अचानक घडलेल्या या बर्निंग ट्रेनच्या थरारामुळे प्रवाशांनी तात्काळ स्वत:हून ही आग विझवण्यास सुरुवात केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. लोकलचा थोडासा भाग मात्र जळाला आहे.

आज सकाळी 8 वाजून 18 मिनिटांनी ही घटना घडली. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकलमधून अचानक धूर निघाला. आसनगाव स्टेशनाजवळ लोकल आली असताना ही घटना घडली. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. या लोकलने कसारा स्टेशन काही वेळच झाला होता. इतक्यात लोकलमध्ये आग लागली. आधी लोकलमधून निघाला. त्यामुळे काही तरी जळाल्याचा वास प्रवाशांना आल्याने प्रवाशांनी शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना आगीचे लोळ दिसले. त्यामुळे प्रवाशी अधिकच घाबरले.

ट्रेन चालक आणि प्रवाशांनी आग विझवली

लोकलमध्ये आग लागल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने प्रवासी चांगलेच बिथरले. अनेकजण आगीपासून संरक्षण मिळण्यासाठी सुरक्षित जागा शोधू लागले. तर काही प्रवाशांनी समोर येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.

ट्रेन चालक आणि प्रवाशाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण करण्यात आलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तसेच आग पूर्णपणे विझल्याची खात्री करण्यात आली. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनीही आग विझवल्याची पूर्ण खात्री करूनच लोकल सोडली.

अन् लोकल थांबवली

दरम्यान, आग लागल्याची घटना कळाल्यानंतर ट्रेन चालकाने तात्काळ मध्येच लोकल थांबवली. त्यामुळे प्रवाशांनी पटापट लोकलमधून उड्या मारत अवघ्या काही क्षणात लोकल रिकामी केली. एकही प्रवाशी लोकलमध्ये थांबलेला नव्हता. सर्व प्रवासी उतरले होते. त्यानंतर काही प्रवाशांच्या मदतीने ही आग नियंत्रणात आणण्यात आली.

लोकल उशिराने

दरम्यान, या घटनेमुळे अप व डाऊन मार्गावरील लोकल वाहतूक 15 मिनिटे उशिराने धावत आहे. त्यामुळे या मार्गावरील इतर रेल्वे स्थानकामध्ये मोठी गर्दी झाली आहे. गर्दीमुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत. दाटीवाटी करतच मिळेल त्या ट्रेनने चाकरमानी मुंबईच्या दिशेने निघाल्याचं चित्र दिसत आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.