VIDEO : उल्हासनगरात भरधाव डंपरने पाळीव श्वानाला चिरडलं, कुर्ला कॅम्प परिसरातील घटना सीसीटीव्हीत कैद

उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरातील कालीमाता मंदिराच्या मागे सागर गरजमल हे वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे राणी नावाची रॉटविलर जातीची चार वर्षीय श्वान होती. रविवारी सकाळच्या सुमारास सागर हे राणीला घराबाहेर फिरवत असतानाच अचानक भरधाव वेगात एक डंपर आला आणि त्याने त्याने राणीला धडक देत चाकाखाली चिरडलं.

VIDEO : उल्हासनगरात भरधाव डंपरने पाळीव श्वानाला चिरडलं, कुर्ला कॅम्प परिसरातील घटना सीसीटीव्हीत कैद
उल्हासनगरात भरधाव डंपरने पाळीव श्वानाला चिरडलं
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 8:37 PM

उल्हासनगर : एका भरधाव डंपर चालकाने पाळीव श्वाना (Pet Dog)ला चिरडल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्पमध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्ही (CCTV)त कैद झाली आहे. या घटनेत राणीचा जागीच तडफडून मृत्यू झाला. याप्रकरणी श्वान मालक सागर यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सागर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बबलू येरकर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डंपरचालकाचे नाव आहे. (A pet dog crushed by dumper in Ulhasnagar, incident caught in cctv)

अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरातील कालीमाता मंदिराच्या मागे सागर गरजमल हे वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे राणी नावाची रॉटविलर जातीची चार वर्षीय श्वान होती. रविवारी सकाळच्या सुमारास सागर हे राणीला घराबाहेर फिरवत असतानाच अचानक भरधाव वेगात एक डंपर आला आणि त्याने त्याने राणीला धडक देत चाकाखाली चिरडलं. अपघाताची ही संपूर्ण घटना सागर यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. यानंतर सागर यांची मृत श्वान राणी हिची चार अतिशय लहान पिल्ले असून राणीच्या अपघाती मृत्यूमुळे ती आईच्या मायेला पारखी झाली आहेत. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अन्य एका घटनेत रिक्षा-टेम्पोच्या धडकेत रिक्षाचालक जखमी

रॉंग साईडने आलेल्या टेम्पोला रिक्षाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालक जखमी झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. जखमी रिक्षाचालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवनाथ मोरे असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. नवनाथ हा कल्याणहून व्हीनस चौकात भाडे घेऊन आला होता. तिथून लालचक्कीकडे जात असताना रस्त्यात एक टेम्पो अचानक यू टर्न मारून नवनाथच्या रिक्षासमोर आला. त्यामुळे नवनाथ याने थेट या टेम्पोला धडक दिली. या अपघातात रिक्षाच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले असून रिक्षाच्या काचा नवनाथच्या चेहऱ्यात घुसल्याने त्याला मोठी इजा झाली आहे. या घटनेनंतर टेम्पोचालकानेच त्याला उचलून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. (A pet dog crushed by dumper in Ulhasnagar, incident caught in cctv)

इतर बातम्या

Sangli Accident: सांगलीत काळीज चर्रर्र करणारा अपघात, 7 कि.मी. पर्यंत चिमुकल्याला फरफटत नेलं, पब्लिक संतप्त

पुणे पोलिसांचा पीडितेवर दबाव? चित्रा वाघ यांचा सरकारवर घणाघात, तर महिला आयोगाचे अहवाल सादर करण्याचे आदेश

Non Stop LIVE Update
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले...
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले....
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं.
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर.
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल.
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे.
वडिलांच्या त्या एका शब्दानं आयुष्मान स्टार बनला,कोणता सांगितला किस्सा?
वडिलांच्या त्या एका शब्दानं आयुष्मान स्टार बनला,कोणता सांगितला किस्सा?.
असे प्रश्न महिलांनाच का, कोणत्या प्रश्नावर स्मृती इराणींचा उलट सवाल?
असे प्रश्न महिलांनाच का, कोणत्या प्रश्नावर स्मृती इराणींचा उलट सवाल?.
'मनोज जरांगे यांची सगळी वक्तव्यं...,' काय म्हणाले शंभूराज देसाई
'मनोज जरांगे यांची सगळी वक्तव्यं...,' काय म्हणाले शंभूराज देसाई.
WITT : 'माझं मदिनाला जाणं म्हणजे...', स्मृती इराणी यांचं मोठं वक्तव्य
WITT : 'माझं मदिनाला जाणं म्हणजे...', स्मृती इराणी यांचं मोठं वक्तव्य.
अमूल दूध क्यों पीता है इंडिया? अमूलच्या एमडींनी सांगितला 'X' फॅक्टर
अमूल दूध क्यों पीता है इंडिया? अमूलच्या एमडींनी सांगितला 'X' फॅक्टर.