AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशियातील सर्वात मोठ्या योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या शुभारंभ, काय आहे ही योजना?

समूह विकास योजनेचे कामकाज सांभाळण्यासाठी कशिश पार्क येथे क्लस्टर पुनर्विकासचे कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. या प्रशस्त कार्यालयाचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

आशियातील सर्वात मोठ्या योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या शुभारंभ, काय आहे ही योजना?
| Updated on: Jun 04, 2023 | 5:36 PM
Share

प्रतिनिधी, ठाणे : देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वांत मोठी, महत्वाकांक्षी आणि ऐतिहासिक समूह विकास योजना (क्लस्टर) मूर्तरुप घेत आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा सोमवारी 5 जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या पायाभूत सुविधांसह पुनर्विकास व्हावा यासाठी एकूण 45 नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले. त्याचे एकूण क्षेत्रफळ 1500 हेक्टर एवढे आहे. या 45 आराखड्यांपैकी अत्यंत दाटीवाटीचे क्षेत्र असलेल्या किसननगर नागरी पुनरुत्थान आराखडा क्र. 12 मधील नागरी पुनरुत्थान योजना क्र. 1 व 2 च्या कामाचा उद्या शुभारंभ होणार आहे.

धोकादायक इमारतींचा सामूहिक पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नियमावली तयार करण्यात आली आहे. धोकादायक, अनधिकृत आणि अधिकृत इमारतींचा सुनियोजित विकास होणार आहे.

अंमलबजावणी सिडकोमार्फत होणार

या योजनेच्या कामाची सुरुवात अंतिम भूखंड क्र.186/187 या वरील 7753 चौ.मी क्षेत्रफळावरील भूखंडावर होणार आहे. तसेच रस्ता क्रमांक 22 लगतचा भूखंड क्रमांक एफ- 3 या ठिकाणी 19275 चौ.मी. एवढ्या जागेवर विकास केला जाणार आहे. नागरी पुनरुत्थान 1 व 2 ची अंमलबजावणी सिडको या शासनाच्या कंपनीमार्फत होणार आहे.

समूह विकास योजनेचे कामकाज सांभाळण्यासाठी कशिश पार्क येथे क्लस्टर पुनर्विकासचे कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. या प्रशस्त कार्यालयाचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

सुनियोजित संकुलामध्ये घर, पात्र निवासी लाभधारकास विनामूल्य 323 चौ. फूट मालकी हक्काचे घर तसेच प्रत्येक सेक्टरमध्ये सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रमांसाठी विशेष जागा उपलब्ध करून दिली जाईल. प्रत्येक सेक्टरमध्ये वाचनालय, व्यायामशाळा, आरोग्यकेंद्र आणि कम्युनिटी सेंटरची व्यवस्था राहणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र

पाळणाघरासह महिला सक्षमीकरण केंद्र आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, अरुंद रस्ते आणि गजबजलेल्या गल्लीऐवजी प्रशस्त आणि दर्जेदार रस्ते राहतील. वाहतूक सुविधा, पाणीपुरवठा, मल व जलनि:स्सारण, घनकचरा व्यवस्थापनासह पायाभूत सुविधा राहणार आहेत.

पुनर्विकसित टाऊनशीप आराखड्यामध्ये सुसज्ज आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, उद्यान पार्किंग, मंडई आदी नागरी सुविधांचा समावेश या योजनेत आहे. प्रख्यात वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्या डिझाईननुसार टाऊनशीपची उभारणी केली जाणार आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.