AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैयक्तिक कामं आटोपून घरी परतत होती महिला, पण वाटेतच जे घडलं ते दुर्दैवी !

ठाण्यात पुन्हा एकदा ड्रंक अँड ड्राईव्हची घटना उघडकीस आली आहे. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन् भयंकर दुर्घटना घडली.

वैयक्तिक कामं आटोपून घरी परतत होती महिला, पण वाटेतच जे घडलं ते दुर्दैवी !
भरधाव कारच्या धडकेत एक ठार, दोन जखमीImage Credit source: Google
| Updated on: Jul 12, 2023 | 10:04 AM
Share

ठाणे : रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वाहतुकीचे नियन कितीही कठोर केले तरी बेदकारपणे वाहन चालवणाऱ्यांना आळा घालणे कठिण झाले आहे. यामुळे अनेक निष्पापांना आपला जीव गमवण्याची वेळ येते. अशीच एक विचित्र अपघाताची घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. भरधाव कार उभ्या असलेल्या मोटारसायकलला धडकली. मात्र यावेळी रस्त्यावरुन चालणारी एक महिला कार आणि मोटारयसायकलमध्ये अडकल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पूजा कृष्णाजी सावंत असे 53 वर्षीय मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

घरी परतत असताना कारने धडक दिली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्तक नगर येथील निळकंठ हाईट्स येथील रहिवासी असलेली पूजा सावंत ही महिला वैयक्तिक कामांसाठी बाहेर गेली होती. आपले काम आटोपून सदर महिला सोमवारी रात्री घरी परतत होती. यावेळी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मागून भरधाव कार आली. या कारने महिलेला धडक देत रस्त्यावर उभ्या असलेल्या बाईकला धडक दिली. या धडकेत महिला बाईक आणि कारच्या मध्ये अडकली आणि गंभीर जखमी झाली.

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

गंभी जखमी अवस्थेत महिलेला तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोन महिलाही जखमी झाल्या. याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. दिवाकर शर्मा असे कार चालकाचे नाव आहे. कार चालक दारु पिऊन गाडी चालवत असल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे हा अपघात घडला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.