यापुढे बोलताना भान ठेवून बोला… भाजपने ‘का’ दिला राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याला इशारा

आत्महत्या प्रकरणात भाजपाच्या संदीप माळी यांना नाहक गुंतवलं जात असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे केबल व्यवसायिकाच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आली आहे.

यापुढे बोलताना भान ठेवून बोला... भाजपने 'का' दिला राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याला इशारा
आत्महत्या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामनेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 10:53 PM

सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली : दिवा पनवेल मार्गावरील दातिवली आणि निळजे रेल्वे स्थानकादरम्यान एका व्यावसायिकांनं आत्महत्या (Suicide of Businessman) केल्याची घटना घडली होती. आत्महत्या करण्यापूर्वी या व्यावसायिकाने व्हिडिओ (Video) देखील तयार केला होता. याप्रकरणी भाजपा पदाधिकारी संदीप माळी (Bjp Activist Sandeep Mali) यांच्यासह 15 जणांवर ठाणे जीआरपीमध्ये गुन्हा दाखल झाला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने संदीप माळी याला भाजपामधील वरिष्ठांचं समर्थन आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. याबाबत पत्रकार परिषद घेत भाजपाने सर्व आरोप फेटाळून लावलेत.

या आत्महत्या प्रकरणात भाजपाच्या संदीप माळी यांना नाहक गुंतवलं जात असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे केबल व्यवसायिकाच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आली आहे.

व्यावसायिकाने मानसिक त्रासाला कंटाळून केली होती आत्महत्या

डोंबिवलीतील व्यावसायिक प्रल्हाद पाटील यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी पाटील यांनी एक व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत संदिप माळी मारहाण आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप केला होता. तसेच काही लोकांची नाव जाहीर करत आत्महत्या केली होती.

हे सुद्धा वाचा

रविंद्र चव्हाण हे संदीप माळीला पाठिंबा देत असल्याचा आरोप

यानंतर माळी यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता. याप्रकरणी राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेत माळींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. इतकंच नाही तर भाजपचे नेते कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण हे माळीला पाठिंबा देत असल्याचा देखील आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला होता.

भाजपचे राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

यावरून भाजपानेही राष्ट्रवादीला उत्तर दिलं आहे. ठाणे जिल्ह्यातून राष्ट्रवादी पक्ष संपत चालला आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पक्षावर लक्ष नाही दिलं तर जे दोन पाच लोक निवडून येतात ते देखील येणार नाहीत, असा टोला कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी लगावलाय.

तसेच यापुढे बोलताना भान ठेवून बोला, असा इशाराही देण्यात आला. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणाचा तपास पुढे नेमका कोणत्या दिशेला जातो ते पहावं लागेल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.