अंबरनाथमध्ये तब्बल सव्वा कोटींचा बोकड!; शेरूच्या अंगावर लिहिलंय ‘अल्लाह’ आणि ‘मोहम्मद’

अंबरनाथमध्ये एका व्यक्तीकडे तब्बल सव्वा कोटी रुपयांचा एक बोकड आहे. या बोकडाच्या अंगावर मोहम्मद आणि अल्ला अशी अक्षरे आहेत. त्यामुळे हा बोकड सर्वांसाठी कुतुहूलाचा विषय ठरला आहे.

अंबरनाथमध्ये तब्बल सव्वा कोटींचा बोकड!; शेरूच्या अंगावर लिहिलंय 'अल्लाह' आणि 'मोहम्मद'
goat priceImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 8:41 AM

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एक बोकडाची किंमत तब्बल सव्वा कोटी रुपये इतकी लावण्यात आलीये. या बोकडाच्या अंगावर ‘अल्लाह’ आणि ‘मोहम्मद’ असं लिहिण्यात आलं असून त्यामुळेच या बोकडाच्या मालकानं त्याची 1 कोटी 12 लाख 786 रुपये इतकी किंमत ठेवलीय. या पैशातून गावी मदरसा बांधण्याचं बोकड मालकाचं स्वप्न आहे. या बोकडाचं नाव शेरू असं ठेवण्यात आलं आहे. अत्यंत महागडा असलेला आणि त्याच्या अंगावर अल्लाह तसेच मोहम्मद असं लिहिलेलं असल्याने शेरूला पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे.

अंबरनाथच्या तहसील कार्यालयामागील सिद्धार्थ नगरमध्ये शकील शेख हा परिवारासह राहतो. स्टेशन रोडवर कपड्यांचा स्टॉल लावणाऱ्या शकील याला बोकड आणि बकरी पाळण्याची आवड आहे. त्याच्या घरच्या बकरीला दीड वर्षांपूर्वी एक पिल्लू झालं, त्याचं नाव त्यांनी शेरू असं ठेवलं. या शेरूला लहानपणापासून अतिशय या प्रेमाने वाढवत शकीलने मोठं केलं. या बोकडाच्या मानेवर नैसर्गिकरित्या ‘अल्लाह’ आणि ‘मोहम्मद’ असे शब्द लिहिलेले आहेत.

हे सुद्धा वाचा

दात फक्त दोन, वजन 100 किलो

शेरूला फक्त दोन दात असून त्याचं वजन 100 किलो इतकं आहे. शकीलने कुर्बानीसाठी या बोकडाची किंमत 1 कोटी 12 लाख 786 रुपये इतकी ठेवली आहे. हा बोकड रोज सकाळ संध्याकाळ सफरचंद, द्राक्षे, बाजरी, मका, हरभरा असे पदार्थ खातो. या बोकडाला विकून आलेल्या पैशातून उत्तर प्रदेशातल्या आपल्या गावी मदरसा बांधण्याचं शकीलचं स्वप्न आहे.

पाहणाऱ्यांची गर्दी

दरम्यान, आपल्या परिसरात तब्बल सव्वा कोटीचा बोकड असल्याने हा बोकड पाहण्याचं सर्वांना कुतुहूल निर्माण झालं आहे. तसेच या बोकडाच्या अंगावर अल्लाह आणि मोहम्मद ही अक्षरे असल्याने तर त्याला पाहण्मयासाठी रोज गर्दी होत आहे. या बोकडाचा खुराक पाहूनही अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

आधीच्या बोकडाची किंमत 12 लाख

शकीलने या आधीही त्याचा एक बकरा विक्रीसाठी ठेवला होता, ज्याची किंमत 12 लाखांपर्यंत होती. मात्र त्याने हा बोकड न विकता स्वतःच ईदला त्याची कुर्बानी दिली. आता त्याच्या सव्वा कोटींच्या ‘शेरू’ला कुणी विकत घेतं का? आणि शकीलचं मदरसा बांधण्याचं स्वप्न पूर्ण होतं का? हे पाहावं लागणार आहे.

शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?.
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान.
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध.
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल.