ठाण्यात विसर्जनाच्या सातव्या दिवशीही 1686 भाविकांची अँटीजेन चाचणी; एकाचाच रिपोर्ट पॉझिटिव्ह

ठाण्यात गणेश विसर्जनासाठी महापालिकेने मोठी व्यवस्था केली आहे. विसर्जनासाठी आलेल्या भाविकांचीही अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे. (Antigen test)

ठाण्यात विसर्जनाच्या सातव्या दिवशीही 1686 भाविकांची अँटीजेन चाचणी; एकाचाच रिपोर्ट पॉझिटिव्ह
Antigen test drive

ठाणे: ठाण्यात गणेश विसर्जनासाठी महापालिकेने मोठी व्यवस्था केली आहे. विसर्जनासाठी आलेल्या भाविकांचीही अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे. त्यासाठी 24 ठिकाणी टेस्टची सुविधा देण्यात आली आहे. काल सातव्या दिवशीच्या गणेश विसर्जनावेळी महापालिकेने 1686 भाविकांची अँटिजेन टेस्ट केली. यामध्ये एका व्यक्तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. (Antigen test drive in thane during ganesh idol immersion)

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने 24 विसर्जनाच्या ठिकाणी अँन्टीजेन चाचणी केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे. काल सात दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी आलेल्या 1686 भाविकांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यात फक्त एकाच व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आतापर्यंत दीड दिवसाच्या गणपती विसर्जनावेळी 1,192, पाचव्या दिवशी 2,552 तर सात दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी आलेल्या 1686 अशी एकूण 5430 भाविकांची अँटीजेन चाचणी करण्यात आली आहे.

महापौरांचे आवाहन

दरम्यान, विसर्जनाच्या दहाव्या दिवशी देखील अँटीजेन चाचणी केंद्रावर भाविकांनी चाचणी करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने श्री गणेश विसर्जनासाठी निर्माण करण्यात आलेल्या विसर्जन महाघाट, गणेशमुर्ती स्वीकार केंद्र व कृत्रीम तलावांमध्ये सातव्या दिवशी एकूण 1518 गणेशमुर्तीचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. तर सातव्या दिवशी 3668 नागरिकांनी डिजी ठाणेच्या ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंगद्वारे गणेशमुर्तींचे विसर्जन केले.

भक्तीमय वातावरणात विसर्जन

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवसाच्या सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्था तयार केली आहे. यावर्षीही शहरामधील हजारो भाविकांनी आपल्या सात दिवसांच्या गणपतीचे भक्तिमय वातावरणात विधिवत विसर्जन केले. यावर्षी सातव्या दिवशी 1426 घरगुती गणेशमूर्ती, 67 सार्वजनिक गणेश मूर्ती तसेच 25 स्विकृत असे एकूण 1518 मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले.

कुठे किती विसर्जन

शहरातील मासुंदा व आहिल्यादेवी होळकर येथील कृत्रीम तलावामध्ये यावर्षी 58 घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. खारेगाव कृत्रीम तलावात 49 घरगुती गणेश मूर्ती, आंबेघोसाळे यथील कृत्रीम तलावामध्ये 11 गणेशमूर्ती, रेवाळे कृत्रिम तलाव येथे 61 घरगुती गणेश मूर्ती, मुल्लाबाग येथे 51 घरगुती गणेश मूर्ती, खिड़काळी तलाव येथे 12 घरगुती गणेश मूर्ती व 9 सार्वजनिक गणेश मूर्ती, शंकर मंदीर तलाव येथे 22 घरगुती गणेश मूर्ती व 4 सार्वजनिक गणेश मूर्ती, उपवन तलाव येथे 208 घरगुती गणेश मूर्ती व 15 सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

ऑनलाईन टाइम स्लॉटला प्रतिसाद

पारसिक तलाव येथे बांधण्यात आलेल्या विसर्जन महाघाट येथे 59 घरगुती गणेश मूर्ती, 10 सार्वजनिक गणेश मूर्ती व 25 स्वीकृत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गायमुख घाट 1 येथे 44 घरगुती गणेश मूर्ती, 2 सार्वजनिक गणेश मूर्ती तसेच गायमुख घाट 2 येथे 4 घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मिठबंदर घाट येथे 31 घरगुती गणेश मूर्ती व 09 सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर रायलादेवी घाट 1 येथे 266 घरगुती गणेश मूर्ती, रायलादेवी घाट 2 येथे 144 घरगुती गणेश मूर्ती, कोलशेत घाट 1 व 2 येथे 118 घरगुती गणेश मूर्ती, 13 सार्वजनिक गणेश मूर्ती, आत्माराम बालाजी घाट येथे 03 घरगुती गणेश मूर्ती तसेच दिवा विसर्जन घाट येथे 264 घरगुती गणेश मूर्ती व 5 सार्वजिनक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजी ठाणे प्रणाली मार्फत तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधेंतर्गत सातव्या दिवशी 575 नागरिकांनी बुकिंग करून प्रत्यक्ष विसर्जन केले. (Antigen test drive in thane during ganesh idol immersion)

 

संबंधित बातम्या:

मोर्चा, आंदोलनामुळे काम करणं अशक्य; पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात मनाई आदेश जारी

ठाणे पालिकेला बालमृत्यूचं टेन्शन, बालमृत्यू रोखण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

ठाण्यात बाप्पाच्या विसर्जनासाठी कृत्रीम तलावांकडे भाविकांचा ओघ, पाचव्या दिवशी तब्बल 14 हजार 123 घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन

(Antigen test drive in thane during ganesh idol immersion)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI