Deepali Sayyad : मुलींच्या लग्नात खर्च करण्याऐवजी शिक्षणासाठी करा महिला सक्षम होतील : दीपाली सय्यद

| Updated on: Apr 12, 2022 | 11:56 PM

या मेळाव्यामध्ये विविध बँकांनी देखील सहभाग घेतला होता. यावेळी प्रकाश पाटील यांनी ठाणे ग्रामीण परिसरात 100 इलेक्ट्रिक वाहन महिलांसाठी उपलब्ध करून देणार असून 25 महिलांना मिळूनही एक गाडी देण्यात येणार असल्याचं सांगितलं. तर यावेळी दीपाली सय्यद यांनी हा कार्यक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले.

Deepali Sayyad : मुलींच्या लग्नात खर्च करण्याऐवजी शिक्षणासाठी करा महिला सक्षम होतील : दीपाली सय्यद
शिवसेनेतर्फे आयोजित महिला उद्योजक मेळाव्यात दीपाली सय्यद यांची उपस्थिती
Image Credit source: TV9
Follow us on

कल्याण : सध्या घाणेरडे राजकारण चालू आहे. एकमेकांच्या घरातील वाभाडे काढणे, जातीपातीचे राजकारण, ईडीच्या कारवाया सुरू आहेत. जे इतके दिवस आरोप करत होते ते किरीट सोमैय्या स्वतःच गायब आहेत. याचा अर्थ आता लोकांनी बघावं आणि कोण काय आहे याबाबत लोकांनी स्वतः निर्णय घ्यावा असा टोला दीपाली सय्यद (Deepali Sayyad) यांनी किरीट सोमैय्या (Kirit Somaiya) यांना लगावला आहे. दीपाली सय्यद आज शिवसेनेतर्फे आयोजित महिला उद्योजक मेळाव्यासाठी टिटवाळ्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. शिवसेना व युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमाने टिटवाळा मंदिर धर्मशाळा येथे महिलांना व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी महिला उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शेकडो महिलांनी आपले उत्पादन घेत सहभाग घेतला. (Attendance of Shiv Sena leader Deepali Sayyad at the Women Entrepreneurs Meet organized by Shiv Sena at Titwala)

या मेळाव्याला ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे, शिवसेना उपनेत्या दीपाली सय्यद, मुंबई सिनेट सदस्य शीतल देवरुखकर, युवा सेना सह सचिव जयेश वाणी यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. यावेळी प्रकाश पाटील यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला उद्योजकांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी शिवसेना व युवा सेनेतर्फे हा प्रयत्न सुरू आहे. या मेळाव्यात महिलांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात येतोय.

विविध बँकांचाही मेळाव्यात सहभाग

या मेळाव्यामध्ये विविध बँकांनी देखील सहभाग घेतला होता. यावेळी प्रकाश पाटील यांनी ठाणे ग्रामीण परिसरात 100 इलेक्ट्रिक वाहन महिलांसाठी उपलब्ध करून देणार असून 25 महिलांना मिळूनही एक गाडी देण्यात येणार असल्याचं सांगितलं. तर यावेळी दीपाली सय्यद यांनी हा कार्यक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. पुढे बोलताना नुसतीच आश्वासने देण्यापेक्षा प्रत्यक्षात रोजगार दिल्यावरच महिलांना सक्षम होतील. पालक मुलगी झाल्यावर मुलीच्या लग्नासाठी दागिने तयार करतात. मात्र दागिने बनवण्याऐवजी जर मुलींच्या शिक्षणावर खर्च केला तर मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहील. स्वतःच्या पायावर उभी राहिली तर व्यवसाय करेल आणि लग्नानंतर सुद्धा नवऱ्याला हातभार लावू शकते असं दीपाली यावेळी म्हणाल्या. (Attendance of Shiv Sena leader Deepali Sayyad at the Women Entrepreneurs Meet organized by Shiv Sena at Titwala)

इतर बातम्या

Raj Thackeray Uttar Sabha Thane Live: उभा टाक, राज ठाकरेंनी भर सभेत नगरसेवक सलीम मामू शेखला जेव्हा उभं केलं

Raj Thackeray Uttar Sabha Thane Live: शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेत नाहीत? राज ठाकरेंनी कारणावर बोट ठेवलं