Raj Thackeray Thane Speech : भोंग्ये हटवण्यासाठी राज ठाकरेंची डेडलाईन ते मोदींकडे दोन मोठ्या मागण्या, वाचा ठाण्यातल्या सभेतले 12 मोठे मुद्दे

शिवतिर्थावरील सभा पार पडल्यानंतर त्यावर अजूनही जोरदार प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यानंतर त्या टीकेला उत्तर देण्यासाठी आणि विरोधकांचा खरपूस समाचार घेण्यासाठी आज राज ठाकरेंनी पुन्हा ठाण्यात सभा घेत विरोधकांवर हल्लाबोल चढवला.

Raj Thackeray Thane Speech : भोंग्ये हटवण्यासाठी राज ठाकरेंची डेडलाईन ते मोदींकडे दोन मोठ्या मागण्या, वाचा ठाण्यातल्या सभेतले 12 मोठे मुद्दे
यांचे दाखवायचे 'सुळे' वेगळे, राज ठाकरेंच्या निशाण्यावर पुन्हा सुप्रिया सुळे
Image Credit source: tv9
दादासाहेब कारंडे

| Edited By: सागर जोशी

Apr 13, 2022 | 8:46 AM

ठाणे : राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) ठाण्यातल्या सभेने पुन्हा पॉलिटिकल माहोल बदलला आहे. ठाकरेंची शिवतिर्थावरील सभा पार पडल्यानंतर त्यावर अजूनही जोरदार प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यानंतर त्या टीकेला उत्तर देण्यासाठी आणि विरोधकांचा खरपूस समाचार घेण्यासाठी आज राज ठाकरेंनी पुन्हा ठाण्यात सभा घेत विरोधकांवर हल्लाबोल चढवला. आता व्यासपिठावर येताना अग्निशमन दलाचा बंब दिसला. इतकी काय आग नाही लावणार. आज दुपारी पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला. आता म्हणाला, काही छोट्या फुटक संघटना तुमचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. म्हटलं माझा. नाही म्हणे आम्ही त्यांना डिटेन करेल. फक्त तुमचा निघण्याचा टायमिंग सांगा. मी म्हटलं निघताना सांगतो. माझ्या ताफ्याला कोण तरी अडवणार हे इंटेलिजन्सला (Intelligence) कळलं. पण पवारांच्या (Sharad Pawar) घरी एसटीचे लोकं जाणार आहेत हे इंटेलिजन्सला नाही कळलं. खरं तर त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत असते, असे म्हणत त्यांनी सभेला सुरूवात केली आणि पुन्हा चौफेर टीकेची झोड उडवली.

 1. शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेत नाहीत? असा सवाल करत राज ठाकरेंनी कारणावर बोट ठेवलं, शरद पवार साहेब ज्या ज्या वेळी भाषण करता त्या त्यावेळी ते म्हणतात हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा. त्याआधीही हा महाराष्ट्र आमच्या छत्रपती शिवरायांचं आहे. पण पवार साहेब कधीही छत्रपतींचं नाव घेताना तुम्हाला कोणत्याही सभेत दिसणार नाही. कारण छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर मुसलमान मतं गेली तर काय करायचं. म्हणून ते छत्रपतींचं नाव घेत नाही.
 2. संजय राऊतांना नुसती एक आली तर पत्रकार परिषदेत बोलले. पत्रकार परिषदेत येऊन एका वर्तमान पत्राचा संपाद काय म्हणतो.. भ&^%$^ चु%$^$^ हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे? माझ्या आजोबांनी एक शब्द काढला यावर.. लवंडे, व वर अनुस्वार आहे. म्हणजे काय तर पूर्वी पत्रकार आपल्याकडे जेवायचे आहेत. शिवसेनेकडून पडलं की राष्ट्रवादीकडे, राष्ट्रवादीकडून पडलं की शिवसेनेकडे असे म्हणत खरपूस समाचार घेतला आहे.
 3. राज ठाकरेंनी भर सभेत नगरसेवक सलीम मामू शेखला जेव्हा उभं केलं, आणि हा मराठी मुस्लि बघा मतदारसंघात जास्तीत जस्त मतदार हिंदू असताना निवडूण येतो म्हणत माझा धर्माला विरोध नाही, असे ठणकावून सांगितलं.
 4. तर जितेंद्र आव्हाडांच्या टीकेचाही त्यानी खरपूस समाचार घेतला आहे. हे नगाने फन कढाल्यासरखं बोलतं, आता ये शेपटं धऱतो, गर गर फिरवतो अन् फेकून देतो असे म्हणत राज ठाकरेंनी आव्हाडांना 4 गोष्टी भरसभेत वाचून दाखवल्या.
 5. 12 ते 3 मे, राज ठाकरेंची सरकारला भोंगे उतरवण्यासाठी डेडलाईन दिली आहे, सुप्रीम कोर्टाची टिप्पणीही भरसभेत वाचून दाखवली.
 6. तर हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार, म्हणत राज ठाकरे भोंगे लावण्यावर ठाम असल्येचही दिसून आले आहेत. तर यावेळी ही तर सुरूवात आहे. याच्या पुढचा वाण मला भात्यातून काढायला लावू नका असे म्हणत त्यांनी इशाराही दिला आहे.
 7. तर सुप्रिया सुळेंवर टीका करताना, यांचे दाखवायचे ‘सुळे’ वेगळे आहेत म्हण राज ठाकरेंच्या निशाण्यावर पुन्हा सुप्रिया सुळे आल्या आहेत. त्यांनी अजित पवारांच्या घरावर रेड पडते तर तुमच्या का पडत नाही, असा सवालही सुप्रिया सुळेंना विचारला आहे.
 8. तर अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना, अजित पवार, तुमच्या माहितीसाठी म्हणून तीन व्हिडीओ आणलेत म्हणत ठाकरेंचं पुन्हा लाव रे तो व्हिडीओ ठाण्यातल्या सभेत दिसून आलं.
 9. तर जंत पाटील म्हणत जयंत पाटलांचाही राज ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला आहे, तसेच राज ठाकरेंनी पुन्हा भर सभेत जयंत पाटलांची नक्कलही केली आहे.
 10.  तसेच जयंत पाटलांबाबत बोलताना, जंतराव, हा संपलेला पक्ष नाही, ‘विझवत’ जाणारा पक्ष आहे म्हणत राज ठाकरेंनी जयंत पटालांच्या टीकेचा जोरदार समाचार घेतला आहे.
 11. तर अजित पवारांच्या नातलगांवर पडलेल्या ED रेडवर राज ठाकरेंनी खोचक सवाल उपस्थित केले आहेत. एवढ्या कारवाई झाल्या तरीही पवार-मोदींचे संबंध मधूर कसे? असा थेट सवाल त्यांनी केला आहे. तसेच पवारच कारवाई करायला सांगत असतील असे म्हणत त्यांनी शंकाही उपस्थित केली आहे.
 12. तर ईडीच्या कारवाईवरून त्यांनी  कधी टांगतील कळायचंही नाही, अशा शब्दात संजय राऊतांनाही इशारा दिला आहे. कारण उद्या तुम्ही जास्त पुढे पुढे केलं तर पवार तुमच्या मागे चोकशी लावतील असा खोचक टोलाही त्यांनी लगावाला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें