AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Badlapur Case : आईच्या ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी निघाला, अन् थेट तुरुंगात गेला

बदलापूर आंदोलना प्रकरणी बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलिसांनी जे 3 गुन्हे दाखल केले आहेत, त्यात अटक करण्यात आलेले बरेच जण हे आंदोलनातील नसल्याचा दावा या आंदोलकांची बाजू न्यायालयात मांडणारे वकील सत्यन पिल्ले यांनी केला आहे.

Badlapur Case : आईच्या ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी निघाला, अन् थेट तुरुंगात गेला
आईच्या ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी निघाला, अन् थेट तुरुंगात गेला
| Updated on: Aug 22, 2024 | 9:07 PM
Share

चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणानंतर मंगळवारी बदलापुरात झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. या धरपकडीत आंदोलनात नसलेल्यांनाही पोलिसांनी पकडल्याचा आरोप आता होऊ लागलाय. भूषण दुबे नावाच्या तरुणालाही पोलिसांनी अशाचप्रकारे काहीही चूक नसताना पकडून थेट तुरुंगात टाकल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. भूषणच्या जामिनासाठी त्याच्या वयोवृद्ध आजारी वडिलांची मात्र चांगलीच ससेहोलपट झाली.

बदलापूर पश्चिमेला राहणारा भूषण दुबे याच्या आईच्या डोळ्यांना मोतीबिंदू झालाय. त्याचं ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरांची तारीख घेण्यासाठी म्हणून भूषण हा आईची फाईल घेऊन बदलापूरहून अंबरनाथला दवाखान्यात यायला निघाला होता. मात्र याच दरम्यान पोलिसांनी बदलापूर रेल्वे स्थानकात लाठीचार्ज केला आणि आंदोलक कात्रपच्या दिशेने पळत सुटले. या आंदोलकांची पोलिसांनी पाठलाग करून धरपकड केली. यातच भूषण दुबे यालाही पोलिसांनी पकडलं.

यावेळी भूषण याने पोलिसांना आपण आईची हॉस्पिटलची फाईल घेऊन डॉक्टरांकडे ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी जात असल्याचं सांगूनही पोलिसांनी त्याला न सोडल्याचा दावा भूषण याचे वयस्कर वडील कमताप्रसाद दुबे यांनी केला आहे. भूषण याच्या अटकेची कोणतीही माहिती आम्हाला देण्यात आलेली नव्हती. भूषण याच्या एका मित्राने रात्री फोन करून आम्हाला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्याला नेमकं कुठे ठेवलं आहे, हे देखील आम्हाला पोलिसांकडून सांगितलं जात नव्हतं. अखेर भूषण हा भिवंडीला असल्याची माहिती आम्हाला मिळाली, असा दावा भूषण याचे वडील कमताप्रसाद दुबे यांनी केला आहे.

दोन्ही अंगठे कापलेल्या अवस्थेत मुलाच्या जामिनासाठी धावपळ

भूषणच्या जामिनासाठी कमताप्रसाद दुबे हे गुरुवारी दिवसभर उल्हासनगरच्या न्यायालयात फेऱ्या मारत होते. मात्र या प्रकरणात पोलिसांनी आपलं म्हणणं न मांडल्यामुळे भूषणचा जामीन होऊ शकला नाही. भूषण याचे वडील कमताप्रसाद दुबे यांना उच्च मधुमेहाचा त्रास असून त्यांच्या पायाचे दोन्ही अंगठे कापलेले आहेत. तशाच अवस्थेत दुबे हे आपल्या मुलाच्या जामिनासाठी कोर्टाच्या पायऱ्या चढत होते. आपल्या मुलाला विनाकारण अटक करण्यात आली असून त्याची सुटका करण्याची मागणी दुबे यांनी केली आहे.

दरम्यान, बदलापूर आंदोलना प्रकरणी बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलिसांनी जे 3 गुन्हे दाखल केले आहेत, त्यात अटक करण्यात आलेले बरेच जण हे आंदोलनातील नसल्याचा दावा या आंदोलकांची बाजू न्यायालयात मांडणारे वकील सत्यन पिल्ले यांनी केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमधले काही जण विद्यार्थी असून त्यांच्याकडे कॉलेज, क्लास यांचे आयकार्ड सापडले आहेत. काही जण नियमित कामावर जाणारे प्रवासी असून त्यांच्याकडे रेल्वेची तिकीटं आणि पास सापडले आहेत. काही जण आपल्या घरासमोर उभे राहून आंदोलन बघणारे रहिवासी आहेत. मात्र या सर्वांना पोलिसांनी विनाकारण अटक केल्याचा दावा वकील सत्यन पिल्ले यांनी केला आहे.

या सगळ्यानंतर मंगळवारी झालेल्या आंदोलना प्रकरणी पोलिसांच्या हाती खरे आंदोलक न लागल्यामुळे जो दिसेल त्याची धरपकड करण्यात आली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.