एक खड्डा चुकवत असताना दुसऱ्या खड्ड्यात पडून मृत्यू; ठाण्यातील घोडबंदर येथे विचित्रं अपघात

ठाण्यातील घोडबंदर येथे काल अत्यंत दुर्देवी आणि विचित्रं घटना घडली. खड्डा चुकवत असताना तोल गेल्याने दुसऱ्या खड्ड्यात पडून एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. (Bike rider crashed to death while avoiding potholes on Thane road)

एक खड्डा चुकवत असताना दुसऱ्या खड्ड्यात पडून मृत्यू; ठाण्यातील घोडबंदर येथे विचित्रं अपघात
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 7:11 PM

ठाणे: ठाण्यातील घोडबंदर येथे काल अत्यंत दुर्देवी आणि विचित्रं घटना घडली. खड्डा चुकवत असताना तोल गेल्याने दुसऱ्या खड्ड्यात पडून एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मिरारोड ते ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावरील गायमुख या उतरणावर हा अपघात झाला. या घटनेमुळे ठाण्यातील खड्ड्यांचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Bike rider crashed to death while avoiding potholes on Thane road)

मिरारोड ते ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावरील गायमुख या उतरणावर खड्ड्यात तोल जाऊन काल एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मोहम्मद फैजल अल्लाबक्स बाडवाले असं या तरुणाचं नाव आहे. तो मुंब्रा येथील रहिवासी आहे. गायमुख जंक्शन येथे हा अपघात झाला. हा बाईकस्वार खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तो दुसऱ्या खड्ड्यात जाऊन पडला. त्यामुळे त्याच्या बाईकने जोरदार उसळी मारली आणि तो बाईकवरून पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेतच ठाणे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याला मृत घोषित करण्यात आले. कासारवडवली पोलीस स्टेशनने याबाबत अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. अपघातानंतर या तरुणाला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही तासातच त्याचा मृत्यू झाला, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

ठाण्यात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

ठाण्यात खड्ड्यांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. ठाणे ते नाशिक आणि घोडबंदर ते नाशिक महामार्गावर आज सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावर 10 ते 15 किलोमीटरपर्यंत लांबच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना गेल्या 6 तासापासून वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले होते. सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने त्यातून गाडी चालवणं प्रवाशाना कठिण होऊन बसलं आहे. त्यामुळेच या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. एमएमआरडीए प्रशासनाने हा रस्ता बांधला आहे. या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्याचा वाहनधारकांना मोठा फटका बसला आहे.

खड्डे बुजवले तरीही परिस्थिती जैसे थे

दरम्यान, सकाळपासून ठाणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानंतरही वाहतूक कोंडी हटवण्यासाठी वाहतूक विभागाचा एकही अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी कशी सुटणार? असा सवाल केला जात आहे. एमएमआरडीने या महामार्गाचं काँक्रिटीकरण करावं, चांगले रस्ते बनवावेत, पाऊस थांबल्याबरोबर एमएमआरडीएने हे काम हाती घ्यावं, अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत. एमएमआरडीएने दोन तीनवेळा या रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे रस्त्याचे काँक्रिटीकरण हाच त्यावर एकमेव पर्याय आहे, असंही स्थानिकांचं म्हणणं आहे.

अतिरिक्त आयुक्तांच्या अभियंतांना कामाविषयी सूचना

दरम्यान जुलैमध्येच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी ठाण्यातील खड्ड्यांची पाहणी केली होती. माजीवडा मानपाडा प्रभाग समिती, तीन हात नाका, टिपटॉप प्लाझा, सेवा रस्ता लुईसवाडी, एलबीएस मार्ग आणि इतर ठिकाणांच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. तसेच कामाची गती व दर्जा याविषयी अभियंत्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र, हा महामार्ग एमएमआरडीच्या अंतर्गत येत असल्याने एमएमआरडीएने महामार्गाचं काँक्रीटीकरण करण्याऐवजी केवळ खड्डे बुजवून काम भागवलं. त्यामुळेच पुन्हा या रस्त्यावर खड्डे पडल्याचं सांगितलं जात आहे. (Bike rider crashed to death while avoiding potholes on Thane road)

संबंधित बातम्या:

ठाण्यात ठेकेदारांचे बंड; बिले चुकती करा, नाही तर काम बंद करू; ठेकेदारांचा इशारा

धो डाला! ठाणे, पालघरमध्ये पावसाचं धुमशान; सकाळपासून जोरदार हजेरी

कल्याणचा काटई टोलनाका कायमस्वरुपी बंद करा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

(Bike rider crashed to death while avoiding potholes on Thane road)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.