अंबरनाथमध्ये भरधाव बसची दुचाकीस्वाराला धडक; अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी

पवार पती-पत्नीची दुचाकी अंबरनाथ आणि उल्हासनगर दरम्यानच्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आली असता रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे त्यांनी गाडीचा वेग कमी केला. यावेळी मागून आलेल्या भरधाव बसने त्यांना जोरदार धडक दिली.

अंबरनाथमध्ये भरधाव बसची दुचाकीस्वाराला धडक; अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी
अंबरनाथमध्ये भरधाव बसची दुचाकीस्वाराला धडक

अंबरनाथ : भरधाव बसने दुचाकीस्वाराला उडवून 10 ते 15 फूट लांब फरफटत नेल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला आहे. अंबरनाथ आणि उल्हासनगर दरम्यानच्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोर बुधवारी रात्री ही घटना घडली. अंबरनाथच्या चिखलोली पाडा परिसरात राहणारे मंगेश पवार हे त्यांची पत्नी धनश्रीसोबत अंबरनाथहून विठ्ठलवाडीच्या दिशेने त्यांच्या दुचाकीवर जात होते. यावेळी मागून आलेल्या बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. (Bus hit to two wheeler in ambernath; youth maijored injured)

अपघातामुळे तरुणाची प्रकृती गंभीर

पवार पती-पत्नीची दुचाकी अंबरनाथ आणि उल्हासनगर दरम्यानच्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आली असता रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे त्यांनी गाडीचा वेग कमी केला. यावेळी मागून आलेल्या भरधाव बसने त्यांना जोरदार धडक दिली. इतकंच नव्हे, तर त्यांना तब्बल 10 ते 15 फूट लांबपर्यंत फरपटत नेले. या अपघातात मंगेश पवार यांच्या डोक्याला, चेहऱ्याला, छातीला दुखापत झाली असून पोटातही अंतर्गत दुखापत झाली आहे. सुदैवाने त्यांच्या पत्नीला मात्र काहीही इजा झालेली नाही. तर अपघातात त्यांच्या गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

अपघातानंतर बस चालक फरार

या अपघातानंतर बस चालक बस तिथेच टाकून पळून गेला. तर तिथे जमलेल्या लोकांनी मंगेश यांना उचलून आधी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेलं. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईला नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यानंतर त्यांना उल्हासनगरच्या मॅक्सीलाईफ या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मंगेश यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या डॉक्टर उपचार करत आहेत. या अपघातानंतर बस चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी मंगेश यांची पत्नी धनश्री यांनी केली आहे.

खड्ड्यामुळे अनेक अपघात

दरम्यान, ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या ठिकाणी अनेक दिवसांपासून एक मोठा खड्डा पडला असून या खड्ड्यामुळे याच ठिकाणी आजवर अनेक अपघात झाले आहेत. त्यातच या रस्त्यावर पथदिवे सुद्धा बंद असून त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळतेय. त्यामुळे निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबतच या रस्त्याची सुद्धा डागडुजी करण्याची मागणी केली जात आहे.

उल्हासनगरात दिराची वहिनीला मारहाण

हातगाडीची पालिकेत तक्रार केल्याच्या संशयावरून दिराने आपल्या वहिनीला मारहाण केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चंदूमल रहेजा असे मारहाण करणाऱ्या दिराचे तर अंजली रहेजा असे मारहाण झालेल्या वहिनीचे नाव आहे. या घटनेनंतर अंजली यांना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अंजली यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत उल्हासनगर पोलिसांनी चंदूमल रहेजा आणि दिनेश रहेजा या दोघांना अटक केली आहे. (Bus hit to two wheeler in ambernath; youth maijored injured)

इतर बातम्या

पोटच्या मुलाने पित्याच्या डोक्यात पार घातली, रक्तबंबाळ पित्याचा तडफडून मृत्यू, सांगलीतील वेदनादायी घटना

वर्चस्वाच्या वादातून यवतमाळमध्ये मोठा घातपात, दोघांची हत्या, सहा आरोपींना बेड्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI