डोक्यात बेंच टाकला, प्रचंड गदारोळ, लसीकरण केंद्रावर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

निनाद करमरकर

| Edited By: |

Updated on: Jul 07, 2021 | 9:01 PM

बदलापुरात कोरोना लसीकरण केंद्रावरच शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे (clash between shivsena and bjp party workers at vaccination center in Badlapur).

डोक्यात बेंच टाकला, प्रचंड गदारोळ, लसीकरण केंद्रावर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा
डोक्यात बेंच टाकला, प्रचंड गदारोळ, लसीकरण केंद्रावर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

Follow us on

बदलापूर (ठाणे) : बदलापुरात कोरोना लसीकरण केंद्रावरच शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. बदलापूर पालिकेच्या दुबे रुग्णालयात आज (7 जुलै) दुपारी हा प्रकार घडला. हाणामारीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे (clash between shivsena and bjp party workers at vaccination center in Badlapur).

कार्यकर्त्याच्या डोक्यात बेंच टाकला

कोरोना लसीकरण केंद्रांवर राजकीय कार्यकर्ते वशिलेबाजी करत असल्याच्या तक्रारी बदलापुरात अनेकदा समोर आल्या होत्या. त्यातच आज बदलापूर पालिकेच्या दुबे रुग्णालयात शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते थेट एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळालं. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. अक्षरशः खाली पाडून लाथाबुक्यांनी एकमेकांना तुडण्यात आलं. याचवेळी एका गटाच्या कार्यकर्त्याने दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्याच्या डोक्यात थेट बेंच टाकला (clash between shivsena and bjp party workers at vaccination center in Badlapur).

हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद

या सगळ्यामुळे लसीकरण केंद्रावर काही काळ मोठा तणाव निर्माण झाला. हाणामारीचा हा सगळा प्रकार लसीकरण केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. अशा राडेबाज कार्यकर्त्यांमुळे राजकीय पक्षांची प्रतिमा मात्र मलीन झाली आहे. दरम्यान या प्रकाराबाबत बदलापूर पूर्ण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा : ईडीच्या चौकशीआधी एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार, खडसेंच्या मनात नेमकं काय? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI