प्रताप सरनाईकांना अडचणीत आणणाऱ्यांनो त्यांच्या कामाशी स्पर्धा करून दाखवा; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना आव्हान

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 10, 2021 | 2:32 PM

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठराखण केली. जे कोणी प्रताप सरनाईकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. (cm uddhav thackeray)

प्रताप सरनाईकांना अडचणीत आणणाऱ्यांनो त्यांच्या कामाशी स्पर्धा करून दाखवा; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना आव्हान
cm uddhav thackeray

ठाणे: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठराखण केली. जे कोणी प्रताप सरनाईकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी प्रताप यांच्या लोकोपयोगी कामाशी स्पर्धा करून दाखवावी, असं आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं. (cm uddhav thackeray appreciate pratap sarnaik works in covid situation)

प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मीरा रोड येथे हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लांट सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे आव्हान दिले. जे कोणी प्रताप सरनाईकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतील आणि आहेत त्यांनी प्रतापच्या या लोकोपयोगी कामाशी स्पर्धा करून दाखवावी. करा ना… स्पर्धा करा… पण अशी स्पर्धा करा. त्याला आपण हेल्दी कॉम्पिटिशन म्हणतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.

काही करंटे लोक तुमच्या मागे लागले

यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतानाच त्यांना धन्यवादही दिले. दोन्ही गोष्टीचं कारण तुम्हाला माहीत आहे. तुमच्या मागे काही करंटे लोक लागलेले असताना देखील जराही न डचमळता आपल्या सेवेचा वसा तुम्ही सुरू ठेवला. हीच शिवसेना आणि शिवसैनिकांची जिद्द आहे. त्याला जागून तुम्ही जनतेच्या हितासाठी खंबीपणे काम करत चालला आहात, असं सांगतानाच क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाज किंवा गोलंदाज चांगली बॅटिंग करतो, तेव्हा असं काही आजुबाजूला करायचं की त्याचं लक्ष विचलीत होतं. त्याच्या बॉलिंगची लेन्थ आणि लाईन चुकते आणि बॅट्समन सुद्धा डचमळतो. त्यामुळे तो आऊट होतो. तसाच हा घाणेरडा प्रकार आता या क्षेत्रात येत चालला आहे. आला आहे. तुम्ही त्यांच्या कामाने चोख उत्तर दिलं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सरनाईक यांचं कौतुक केलं.

सरनाईकांच्या कामाशी स्पर्धा करा

जनजीवन सुरळीत झालं पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. ते करणारच आहोत. पण ऑक्सिजनचा किती साठा आहे हे आपण पाहिलं पाहिजे. स्पर्धा करायची असेल तर आरोग्यदायी स्पर्धा करायला हवी. शब्दश: अर्थाने ही स्पर्धा हवी. तसेच स्पर्धा करायचीच असेल तर प्रताप सरनाईकच्या कामाशी स्पर्धा करा, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.

दुसऱ्या लाटेवर बोलणंही नकोसं वाटतं

दुसऱ्या लाटेबाबत आता ऐकणं आणि बोलणंही नकोसं वाटतं, असे ते दिवस होते आणि तो अनुभव होता. अंगावरचा काटा येतो. तुम्ही बोलत असताना मला आठवलं. तुम्ही सर्व जणं, आपल्या प्रशासनाचे अधिकारी आणि शिवसैनिकांनी रात्र रात्रं जागून जनतेच्या हितासाठी जे काम केलं त्याला तोड नाही, असं त्यांनी सांगितलं. (cm uddhav thackeray appreciate pratap sarnaik works in covid situation)

संबंधित बातम्या:

आंदोलनं कसली करताय?, कोरोना हा काही सरकार मान्य कार्यक्रम नाहीये; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडसावले

दिल्लीत चार दिवस राहूनही अमित शाहांची भेट नाही, नाकारली? चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

भाजप इलेक्शन मोडवर? केंद्रीय मंत्री जनआशीर्वाद यात्रा काढणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

(cm uddhav thackeray appreciate pratap sarnaik works in covid situation)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI