वाहतूक कोंडीवरुन एसटी बस चालक आणि वाहतूक पोलिसात वादंग

| Updated on: Sep 02, 2021 | 3:13 PM

शिवाजी चौकात कर्तव्य बजावित असलेल्या वाहतूक पोलिसांनी पुढच्या सर्कलला जास्त ट्रॅफिक आहे. त्यामुळे भिवंडी-कल्याण एसटी चालकास बस थांबवा नंतर पुढे जा असे सांगितले. या मुद्यावरुन बस चालक, महिला कंडक्टर आणि वाहतूक पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला.

वाहतूक कोंडीवरुन एसटी बस चालक आणि वाहतूक पोलिसात वादंग
वाहतूक कोंडीवरुन एसटी बस चालक आणि वाहतूक पोलिसात वादंग
Follow us on

कल्याण : कल्याण डोंबिवलीत नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड सामना करावा लागतो. या वाहतूक कोंडीमुळे चालकांमध्ये वाद होतो. मात्र कल्याणच्या शिवाजी चौक परिसरात थेट एसटी चालक आणि वाहतूक पोलीस आपसात भिडले. या दोघांच्या वादामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वाहतूक कोंडी असल्याने वाहतूक पोलिसांकडून बस चालकाला बस थांबवण्यास सांगण्यात आले होते. या शुल्लक कारणावरुन हा वाद निर्माण झाला. (Controversy between ST bus driver and traffic police over traffic congestion)

पुढील सर्कलला ट्रॅफिक असल्याने एसटी चालकाला थांबण्यास सांगितले

कल्याण शीळ रस्त्यावर गाडीचा धक्का लागल्याने चंदन यादव दुचाकीस्वाराला अन्य दुचाकी स्वाराने रॉडने मारहाण करुन जखमी गेले होते. डोंबिवलीत सुद्धा वाहतूक कोंडी दरम्यान धक्का लागल्याने अनेकदा वादाचे प्रकार घडले आहे. नागरिकांमध्ये हे प्रकार घडत असतात. आज कल्याणमध्ये थेट एसटी बस चालक आणि वाहतूक पोलिस आमने सामने होते. शिवाजी चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होती. शिवाजी चौकात कर्तव्य बजावित असलेल्या वाहतूक पोलिसांनी पुढच्या सर्कलला जास्त ट्रॅफिक आहे. त्यामुळे भिवंडी-कल्याण एसटी चालकास बस थांबवा नंतर पुढे जा असे सांगितले. या मुद्यावरुन बस चालक, महिला कंडक्टर आणि वाहतूक पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. या वादामुळे शिवाजी चौकात गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. बसच्या मागे वाहनांची रांग लागली होती. मागे रांगेत उभे असलेल्या वाहन चालकांकडून आरडाओरड सुरु झाली.

रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप

कल्याण डोंबिवलीत रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडी या दोन्ही कारणामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी होते. डोंबिवलीत ठाकुर्ली पूलाजवळ रस्त्यावर खड्डे पडल्याने एक एक तास वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत. त्याठिकाणी वाहतूक पोलिसांनी खड्डे बुजवल्यानंतर जागी झालेल्या महापालिकेने खड्डे बुजविले. कल्याण शीळ रस्त्याचे काम सुरु आहे. या ठिकाणीही वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांमध्ये अनेकदा वाद होतात. (Controversy between ST bus driver and traffic police over traffic congestion)

इतर बातम्या

तरुणी आंघोळ करताना व्हिडीओ शूट, धमकावून अपहरण करत अत्याचार, नागपुरातील प्रकार

अबब! काय सांगता, कापडी पिशव्यांसाठी पुण्याच्या नगरसेवकांकडून तब्बल 11 कोटींची उधळपट्टी!