AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लीम आणि दलितांची नावे मतदार याद्यांमधून गायब; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

मुस्लीम आणि दलितांची नावे जाणीवपूर्वक मतदार याद्यांमधून कापली जात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. (dalit-muslim name missing from voter list, says jitendra awhad)

मुस्लीम आणि दलितांची नावे मतदार याद्यांमधून गायब; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट
jitendra awhad
| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 4:55 PM
Share

ठाणे: मुस्लीम आणि दलितांची नावे जाणीवपूर्वक मतदार याद्यांमधून कापली जात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांच्या या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच मतदार याद्या आधार कार्डशी जोडण्याची मागणी करणार असल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

पुढील वर्षी ठाणे महानगर पालिकेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययाववत करण्यात येत आहेत. मात्र, मुंब्रा-कळवा मतदारसंघातील अनेक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. महानगर पालिका निवडणुकांच्या आधी फक्त मुंब्रा- कळव्याच्याच नव्हे तर सबंध महाराष्ट्राच्या मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ करण्यात आलेला आहे. मुंब्रा येथे 20 ते 30 हजार मतदारांची नावे कापण्यात आलेली आहेत. त्यासाठी स्थलांतरण असा शेरा मारण्यात आलेला असला तरी सद्यस्थितीमध्ये ते मतदार त्याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. ही नावे गाळण्यामागे जबाबदार कोण आहे, याचा विचार केल्यास ही जिल्हाधिकार्‍यांची जबाबदारी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम होत असते. म्हणून आमची मागणी आहे की, मतदार याद्यांची फेरतपासणी करावी आणि जे चुकीच्या पद्धतीने स्थलांतरीत दाखविण्यात आलेले आहेत. ते स्थलांतरण रद्द करुन संबधित मतदारांना पूर्ववत यादीमध्ये समाविष्ट करावेत, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.

मतदानाचा अधिकार हिरावला जातोय

दरम्यान, मतदार याद्यांमधून नावे गायब करून संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकारच काढून घेण्याचा प्रयत्न प्रशासकीय अधिकारी करीत आहेत. खासकरून मुस्लीम आणि दलितांची नावे कापली जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

आधारकार्डशी मतदार याद्या जोडा

निवडणूक मतदार याद्या तपासल्या असता मुंब्र्यामधील जवळ जवळ 20 ते 30 हजार नावे गायब झाल्याची दिसत आहेत. ती मुख्यत: दलित आणि मुस्लिम समाजातील आहेत. हे कोण करत? व का करत? हे मी ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी, निवडणूक आयुक्त आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देणार आहे. या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी. तसेच निवडणूकीच्या मतदार याद्या आधार कार्डशी जोडल्या जाव्यात, अशी मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

सर्वस्तरातून टीकेनंतर सरकारला जाग, आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी 8 निरीक्षकांची नेमणूक

VIDEO: ईडीची पुढची कारवाई अशोक चव्हाणांवर?; चंद्रकांतदादा म्हणतात, माझ्या हसण्यातून काय तो अर्थ काढा

पाकिस्तानसोबत एक तरी लढाई झाली पाहिजे, भारत-पाक क्रिकेट सामना नकोच; रामदास आठवलेंचा षटकार

(dalit-muslim name missing from voter list, says jitendra awhad)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.