कळव्यात आव्हाड आणि श्रीकांत शिंदेंमध्ये निधीवरून जुगलबंदी; जलकुंभाच्या लोकार्पण सोहळ्यात नाराजीनाट्य

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिले. गेली दोन वर्षे महापलिकेत निधी उपलब्ध नाही, पालिकेची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहेत. त्यामुळे या कामासाठी नगरविकास विभागाने निधी दिला आहे.

कळव्यात आव्हाड आणि श्रीकांत शिंदेंमध्ये निधीवरून जुगलबंदी; जलकुंभाच्या लोकार्पण सोहळ्यात नाराजीनाट्य
कळव्यात आव्हाड आणि श्रीकांत शिंदेंमध्ये निधीवरून जुगलबंदी

ठाणे : कळवा परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटवा, यासाठी जलकुंभाची उभारणी करण्यात आली आहे. या जलकुंभाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे. या सोहळ्याची सध्या चर्चा सुरु आहे ती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातील जुगलबंदीची. जलकुंभाला मिळणाऱ्या निधीवरून आव्हाड आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली. त्यामुळे जलकुंभाचा उद्घाटन सोहळ्यात उपस्थितांना दोन नेत्यांमधील नाराजीनाट्य पाहायला मिळाले.

निधीअभावी कामे खोळंबल्याने आव्हाडांनी व्यक्त केली नाराजी

कळवा, खारेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण होत आहे. या भागाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या पाण्याचा प्रश्नही दिवसेंदिवस अधिक जटिल बनत चालला आहे. नागरिकांच्या घरात वेळेवर पाणी पुरवठा होत नाही. ही समस्या लक्षात घेत स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक गेली अनेक वर्षे पाठपुरावा करत होते. मात्र निधीअभावी विकासकामांची गाडी पुढे सरकलेली नाही. विकासकामांना निधी मिळत नसल्यामुळेच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जलकुंभच्या लोकार्पण सोहळ्यातच नाराजी व्यक्त केली.

आव्हाडांचा श्रीकांत शिंदेंना टोला

कळवा मुंब्रामधील विकास कामासाठी गेली 2 वर्षे निधी मिळत नसून निधी मिळावा म्हणून मी राज्य सरकार आणि महापलिकेच्या मागे लागलो आहे. मात्र आता कुठेही जाण्यात काही अर्थ नाही, कारण निधी देण्यासाठी ‘पोरासाठी बाप कधीही’ तयार असतो, असा टोला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना लगावला.

आव्हाडांच्या टोमण्याला श्रीकांत शिंदेंचे उत्तर

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिले. गेली दोन वर्षे महापलिकेत निधी उपलब्ध नाही, पालिकेची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहेत. त्यामुळे या कामासाठी नगरविकास विभागाने निधी दिला आहे. आपल्याला आवश्यकता असल्यास नक्कीच नगरविकास विभाग निधी दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी गेले दोन वर्षे मागे लागलोय, विकासकामांसाठी 25 कोटी रुपये द्या, अशी मागणी करतोय. त्यावर आज देतो, उद्या देतो, फाईल गेलेली आहे, असे करत करतच ह्यांना मंत्री बनवून ठेवा, एवढीच विनंती आहे, असा मिश्किल टोला लगावला. त्यामुळे जलकुंभ लोकार्पण सोहळ्यात दोन नेत्यांमधील ही जुगलबंदीच चर्चेचा विषय ठरली. (Dissatisfaction between Shrikant Shinde and Jitendra Awhad at the inauguration ceremony of Jalkumbh)

इतर बातम्या

VIDEO | उल्हासनगरात दारूसाठी पैसे मागत गावगुंडांचा हैदोस; पोलिसांनी त्याच परिसरातून काढली गावगुंडांची ‘वरात’

Thane Sero Survey | ठाण्यात सिरो सर्वेक्षण, 90% हून अधिक जणांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या

Published On - 10:54 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI