AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्यानंतर ठाण्यात फेरिवाला हटाव; अनधिकृत टपऱ्या, स्टॉल, हातगाड्यांवर हातोडा

महापालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरिवाल्यांनी हल्ला केल्यानंतर ठाण्यात फेरिवाला हटाव मोहीम अधिक वेगवान करण्यात आली आहे. (Drive against hawkers intensified in Thane following attack on woman officer)

कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्यानंतर ठाण्यात फेरिवाला हटाव; अनधिकृत टपऱ्या, स्टॉल, हातगाड्यांवर हातोडा
hawkers
| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 10:44 AM
Share

ठाणे: महापालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरिवाल्यांनी हल्ला केल्यानंतर ठाण्यात फेरिवाला हटाव मोहीम अधिक वेगवान करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने अनधिकृत फेरिवाल्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे शहरातील अनधिकृत फेरिवाल्यांच्या हातगाड्या, टपऱ्या आणि स्टॉल तोडण्यात आले आहेत. तर काही फेरिवाल्यांचे साहित्य जप्त करण्यात आलं आहे. (Drive against hawkers intensified in Thane following attack on woman officer)

ठाणे महापालिकेने काल मंगळवारी ही धडक कारवाई केली. कारवाईतंर्गत कळवा प्रभाग समितीमधील कळवा स्टेशन रोड ते कळवा भाजी मार्केट, खारेगाव पारसिक नगर, टीएमटी बस डेपो परिसरातील पथ विक्रेते व फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. वागळे प्रभाग समितीमधील रोड नं 16, किसन नगर नं 1,2,3 ते श्रीनगर, आयप्पा मंदिर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करून 3 हातगाडया, 32 पावसाळी शेड, 6 टपऱ्या व श्रीनगर येथील अनाधिकृत रिक्षा स्टॅण्डवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

उथळसर प्रभाग समितीमधील कॅडबरी जंक्शन ते आंबेडकर रोड, खोपट रोडवरील अनधिकृत फेरीवाले हटविण्यात आले व हातगाड्या 5 जप्त करून दुकानासमोरील वाढीव प्लास्टिक शेड निष्कासित करण्यात आले. यासोबतच माजिवडा – मानपाडा प्रभाग समितीमधील कापूरबावडी नाका ते कोलशेत रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर व पदपथावर असलेले फेरीवाले, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण हटविण्याचे कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतंर्गत 1 लोखंडी बाकडे, 4 ताडपत्री शेड, 5 हातगाड्या, 1 लाकडी बाकडा, 2 पान टपऱ्या निष्कसित करण्यात आल्या तर 1 लोखंडी कपाट, 1 जाळी काउंटर, 1 शेगडी, 2 सिलेंडर, 2 स्टील काउंटर व 1 शोरमा मशीन जप्त करण्यात आले.

hawkers

hawkers

तसेच दिवा प्रभाग समितीमधील शीळ मुख्य रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले तसेच फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. यामध्ये 7 हातगाड्या, 3 लाकडी टेबल व 2 लोखंडी स्टॉल जप्त करण्यात आले तर 3 अनधिकृत शेड तोडण्यात आले.

hawkers

hawkers

सदरची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, महेश आहेर, विजयकुमार जाधव, संतोष वझरकर आणि अलका खैरे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या सहाय्याने केली.

hawkers

hawkers

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल ठाण्यातील फेरिवाल्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. ठाण्यामध्ये जी काही दुर्घटना घडली ती पाहिल्यानंतर आता काही ठिकाणी अत्यंत कठोरपणे आणि कडकपणाने कायदा राबवावा लागेल. तिकडे दयामाया क्षमा दाखवता येणार नाही. दाखवू शकत नाही. आपल्याला आपल्या नागरिकांच्या आणि खास करून माता भगिनींच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्यावर आहे. त्याबाबत कुठेही हयगय चालणार नाही. स्कायवॉकच नव्हे तर इतर ठिकाणी सुद्धा फेरिवाल्यांचा उच्छाद असेल तर फेरिवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल. त्या दृष्टीने आपल्याला काम करावचं लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. (Drive against hawkers intensified in Thane following attack on woman officer)

संबंधित बातम्या:

पालघरमध्ये लसीकरणाचा नवा विक्रम; एकाच दिवशी होणार एक लाख नागरिकांचं लसीकरण

कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी ठाण्यात विशेष लसीकरण सत्र

गणेशोत्सवदरम्यान ठाण्यात लसीकरण बंद राहणार, पालिका प्रशासनाचा निर्णय

(Drive against hawkers intensified in Thane following attack on woman officer)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.