AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Election : ठाण्यात युती होण्याआधीच एकनाथ शिंदे शिवसेना-भाजपमध्ये शाब्दीक युद्ध, उंची बिचीचा विषय…

Thane Election : ठाण्याचा महापौर भाजपचा झाला पाहिजे, असं दोन दिवसांपूर्वी आमदार संजय केळकर यांनी विधान केलं होतं. ठाण्यातील दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून स्वबळाचा आग्रह धरला जात आहे.

Thane Election : ठाण्यात युती होण्याआधीच एकनाथ शिंदे शिवसेना-भाजपमध्ये शाब्दीक युद्ध, उंची बिचीचा विषय...
Naresh Mhaske-Sanjay Kelkar
| Updated on: Oct 16, 2025 | 3:27 PM
Share

ठाण्यात काल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपबद्दल नाराजीचा सूर होता. भाजपसोबत येत नसल्याने सेनेचाही एकला चलो रे चा नारा सुरु आहे अशी सुत्रांनी माहिती दिली. ठाण्याच्या टेंभी नाका परिसरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बैठक पार पडली. बैठकीत अनेक माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांकडून ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा आग्रह धरण्यात आल्याची माहिती आहे. ठाणे जिल्ह्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आज भाजपच शिबिर होत आहे, त्याच्या बरोबर एकदिवस आधी शिंदेंच्या शिवसेनेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठक पार पडली.

शिवसेनेच्या माजी नगरसेवकांकडून होत असलेल्या विकासकामांमध्ये भाजपचे काही पदाधिकारी अडथळे आणत असल्याची तक्रार करण्यात आली. ठाणे महापालिकेच्या एकूण 33 प्रभागातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांसाठी भाजपच आज मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलय. ठाण्याचा महापौर भाजपचा झाला पाहिजे, असं दोन दिवसांपूर्वी आमदार संजय केळकर यांनी विधान केलं होतं. ठाण्यातील दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून स्वबळाचा आग्रह धरला जात आहे.

त्याचा अर्थ ढवळाढवळ करतो असा होत नाही

उदय सामंत बोलले की काही लोकांनी युतीबद्दल उंची पाहून बोलावं, त्यावर भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनी उत्तर दिलं. खरं म्हणजे उंची बिचीचा विषय काढण्याचं कारण नाही. महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्याचप्रमाणे निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण तयार केलं जातं असं आमदार संजय केळकर म्हणाले. स्वबळाचा नारा दिला जातोय, खिंडार पडतय त्यावर ते म्हणाले की, खिंडाराचा विषय नाही. विधानसभा, लोकसभेला युती होती. खर म्हणे कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी, हक्कासाठी, न्यायासाठी जगात आम्ही कुठेही जाऊ. त्याचा अर्थ ढवळाढवळ करतो असा होत नाही. हे काम आमचं परमकर्तव्य आहे. ही संघटना 18 कोटी सदस्य असलेली जगातली नंबर एक संघटना आहे. हा ढवळाढवळीचा विषय नाही. कार्यकर्त्याला न्याय, त्याच्या माध्यमातून जनतेची सेवा हीच भाजपची 365 दिवस भूमिका आहे

त्याच्याआधी सुद्धा वेगवेगळे लढून एकहाती सत्ता आणतच होतो

महायुती म्हणून लोकसभा, विधानसभा लढलो, आता नागरिकांसमोर जाताना ठाणे महापालिकेत युती म्हणून लढावं ही आमची इच्छा आहे. समोरच्याची इच्छा नसेल, तर गेली 10 वर्ष त्याच्याआधी सुद्धा वेगवेगळे लढून एकहाती सत्ता आणतच होतो. त्यामुळे आमची प्रत्येक वॉर्डात तयारी आहे. पण राज्यातील युतीचे नेते जो निर्णय घेतील, त्याचं आम्ही पालन करु असं ठाण्यातील शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.