AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pratap Sarnaik : गो बॅक… गो बॅक… प्रताप सरनाईक गो बॅक… शिंदेंच्या मंत्र्याविरोधात जनआक्रोश… मनसेचा मोर्चा चिघळला

Pratap Sarnaik : या मोर्चामध्ये प्रचंड संख्येने लोक सामील झाले होते. यावेळी शिवसेनेचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा मोर्चात सहभागी झाले होते. पण त्यांना तिथे नकारात्मक प्रतिसाद मिळाला. प्रताप सरनाईक मोर्चाच्या ठिकाणी येताच जय गुजरातच्या घोषणा देण्यात आल्या.

Pratap Sarnaik : गो बॅक... गो बॅक... प्रताप सरनाईक गो बॅक... शिंदेंच्या मंत्र्याविरोधात जनआक्रोश... मनसेचा मोर्चा चिघळला
Pratap Sarnaik
| Edited By: | Updated on: Jul 08, 2025 | 1:57 PM
Share

आज मीरा-भाईंदरमध्ये मनसेने भव्य मोर्चा काढला. सुरुवातीला या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मनसे कार्यकर्त्यांच अटक सत्र सुरु होतं. पण हळूहळू जनमताचा रेटा वाढत गेला. मनसे मोर्चावर ठाम राहिली. अखेर पोलिसांना मोर्चाला परवानगी द्यावी लागली. या मोर्चामध्ये प्रचंड संख्येने लोक सामील झाले होते. यावेळी शिवसेनेचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा मोर्चात सहभागी झाले होते. पण त्यांना तिथे नकारात्मक प्रतिसाद मिळाला. प्रताप सरनाईक मोर्चाच्या ठिकाणी येताच जय गुजरातच्या घोषणा देण्यात आल्या. गो बॅक… गो बॅक… प्रताप सरनाईक गो बॅक… अशी सुद्धा घोषणाबाजी जाली.

“मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये सोडवण्यासाठी मी आलो होतो. मराठी बांधवांना आणि मीरा-भाईंदरमधील मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलो होतो” असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

बाकीच्यांना जे काय राजकारण करायचय ते करुं दे

पत्रकारांनी त्यांना विचारलं, तुम्ही आल्यावर जय गुजरातच्या घोषणा दिल्या. त्यावर प्रताप सरनाईक म्हणाले की, “राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे. माझ्यासोबत मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख आहेत. त्यामुळे बाकीच्यांना जे काय राजकारण करायचय ते करुं दे. प्रताप सरनाईक मीरा-भाईंदरमधील मराठी जनांच्या पाठिमागे ठामपणे उभा आहे”

मनसे की उद्धव ठाकरे गट राजकारण करतोय?

मनसे की उद्धव ठाकरे गट राजकारण करतोय? यावर ते म्हणाले की, “अशावेळी मी कोणाला दोष देणरा नाही. माझी भूमिका ही मोर्चाला पाठिंबा देण्याची होती” “मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, ज्या पद्धतीने डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी बेकायदपणे आमच्या मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक केली, त्याचा निषेध करण्यासाठी आलोय” मुख्यमंत्री म्हणातयात की, मोर्चाला परवानगी देणार होतो. पण मोर्चाचा मार्ग असा होता की, वाद निर्माण होईल. त्यावर प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिलं की, “व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा देत असाल, तर या मोर्चाला सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे”

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी