MNS Mira Bhayandar Morcha : ‘हातभर फाटली, प्रताप सरनाईकला चप्पलेने मारलं पाहिजे’, ठाकरे गटाचे जिव्हारी लागणारे शब्द
MNS Mira Bhayandar Morcha : "मी प्रतार सरनाईकांच ऐकलं, ते पोलिसांवर बिल फाडत होते. अरे दे ना राजीनामा, युतीमध्ये बसलायसना. हिंदी सक्तीच बिल तुम्ही आणलं. राजीनामा दे बाहेर पडं, मग तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे"

“मला वाटतं गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्रात सर्व मराठीवर प्रेम करणारी सर्व जाती धर्मातील लोक असतील, महाराष्ट्रात एकत्र आलेले आहेत. गेल्यावेळी मुंबईत मोर्चा निघणार होता. या लोकांनी मोर्चा काढू दिला नाही. आम्ही सामंजस्याचा मार्ग काढून डोममध्ये मेळावा केला. मराठी माणसाची एकजूट पहायला मिळाली. त्यानंतर हातभर फाटल्यानंतर आज त्यांना असं वाटलं की, मीरा-भाईंदरमध्ये आम्ही दागागिरी करुन मोर्चा काढू देणार नाही” असं माजी खासदार आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते राजन विचारे म्हणाले.
“प्रताप सरनाईक आले होते. त्यांना पळवून लावलं. त्यांना पळवून नाही, चप्पलेने मारलं पाहिजे. या दोन्ही आमदारांनी जाणूनबुजून मोर्चा होऊ नये, यासाठी सरकारवर दबाव आणून मोर्चा होऊ नये यासाठी प्रयत्न केला” असा आरोप राजन विचारे यांनी केला. मीर-भाईंदरमधील मराठी भाषिकांना धन्यवाद देईन. हा तुमच्या एकजुटीचा विजय आहे. मोर्चाला परवानगी दिली असतील तर काय बिघडलं असतं?” असा प्रश्न राजन विचारे यांनी विचारला.
‘अरे दे ना राजीनामा’
“मी प्रतार सरनाईकांच ऐकलं, ते पोलिसांवर बिल फाडत होते. अरे दे ना राजीनामा, युतीमध्ये बसलायसना. हिंदी सक्तीच बिल तुम्ही आणलं. राजीनामा दे बाहेर पडं, मग तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. यांनी हिंदू-मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला. बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला, त्याने काय झालं नाही. आता हिंदी भाषिक आणि मराठी भाषिकांमध्ये लावून देण्याचा प्रयत्न आहे. या महाराष्ट्रात आम्ही दादागिरी चालू देणार नाही” असं राजन विचारे यांनी ठणकावून सांगितलं.
