तर उत्पल पर्रिकरांच्या नाराजीचा गोव्याच्या राजकारणावर परिणाम होईल; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

भाजपने गोव्यात पहिली यादी जाहीर केली आहे. यात उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारलं आहे. त्यामुळे पर्रिकर नाराज असून त्यांच्या नाराजीचे परिणाम संपूर्ण गोव्याला भोगावे लागतील.

तर उत्पल पर्रिकरांच्या नाराजीचा गोव्याच्या राजकारणावर परिणाम होईल; जितेंद्र आव्हाडांचा इशारा
घर विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाहीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 6:32 PM

ठाणे: भाजपने गोव्यात पहिली यादी जाहीर केली आहे. यात उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारलं आहे. त्यामुळे पर्रिकर नाराज असून त्यांच्या नाराजीचे परिणाम संपूर्ण गोव्याला भोगावे लागतील, असा इशारा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. गोव्यात उत्पल पर्रिकर यांचे तिकिट नाकारले तर भाजपला त्याचे परिणाम भोगावे लागेल. कारण, मनोहर पर्रिकर हे गोव्याने स्वीकारलेले नेतृत्व होते. जात-धर्माच्या पलिकडे लोकांनी त्यांच्यावर प्रेम केले होते. अचानक त्यांच्या मुलाला उत्पल यांना शिस्तीच्या नावाखाली तिकिट नाकारल्यास त्याचा परिणाम गोव्याच्या राजकारणावर होईल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

बावनकुळे यांनी खात्री करावी; राजकारण नको

राज्य मागासवर्गीय आयोगाच्या बैठकाच झालेल्या नाहीत, असे विधान भाजप नेते चंद्रशेख बावनकुळे यांनी केले आहे. त्यावरूनही त्यांनी बावनकुळेंना फटकारले. बावकनुळे कुठून माहिती आणतात आपणाला माहीत नाही. त्यांना मला एकच विचारायचे आहे की, जेव्हा मंडल आला तेव्हा आपण कूठे होतात? आपल्या हातात कमंडल होते. त्यामुळे अचानक आपण ओबीसी असल्याचे कशाला दाखवून देता, काही माहिती नसताना! दहा बैठका झालेल्या आहेत. सतत बैठका होत आहेत. कारण नसताना उगाच संभ्रम निर्माण करुन राजकारण करु नका. कारण, ओबीसी हा मागास समाज आहे. त्यामध्ये राजकारण करुन त्यांची अडवणूक करु नका. आपण प्रचंड बुद्धीमान आहात. आपणाला मंत्रालयातील प्रत्येक कागद मिळतो, याची मला खात्री आहे. पण, हे कागद पुरवणारे नेमके कोणते शब्द गहाळ करतात याची खात्री करुन घ्या, असा टोलाही त्यांनी लगावला.

आघाडी झालीच पाहिजे

मी नेहमी सांगतोय की, महाविकास आघाडी झालीच पाहिजे. लोकांना जे वाटायचे असेल ते वाटू द्या. राजकीयदृष्ट्या विचार केला तर, कार्यकर्त्यांचे मनोमिलन आज केले नाही तर पुढील काळात ते अवघड जाईल. हा धोक्याचा इशारा सर्वांना आहे. महापालिका नजरेसमोर ठेवून पुढील 10 वर्षांचे राजकारण केले जाणार असेल तर ते चुकीचे ठरेल, असा युक्तीवाद त्यांनी केला.

छातीचा कोट करून उभा राहीन

रेल्वे रुळालगतच्या सर्व झोपड्या हटविण्याचा प्रयत्न केला तर लाखो लोकांचे संसार उघड्यावर येतील. त्यामुळे एकही झोपडी मी पाडू देणार नाही. मी मंत्री नंतर आहे, आधी मी लोकांचा कार्यकर्ता आहे. त्या एकाही माणसाला मी घराच्या बाहेर पडू देणार नाही. निवारा हा त्यांचा हक्क आहे. त्यांचा हक्क कोणी हिरावून घेणार असेल तर हिरावणार्‍यासमोर मी छातीचा कोट करुन उभा राहिन. गरीबाला न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

मिठागरांवर इमारती बांधू देणार नाही

मिठागरांच्या जागेवर घर बांधण्यासाठीचा केंद्र सरकारने राज्य सरकारला काही वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविला होता. तो एक पाऊल पुढे गेलेला आहे. एमएमआरडीएने आराखडे वगैरे तयार करण्याचे धोरण आखले आहे. त्यासाठी एजन्सी नेमलेली आहे. माझे या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणे झालेले आहे. मिठागरे ही केवळ मिठागरे नसून भूगर्भातील पाण्याची पातळी टिकवण्याचे मोठे माध्यम आहे. त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आता मुंबईत जाणवत आहे. मात्र, जर ही मिठागरे गेली तर हा परिणाम मोठ्याप्रमाणात जाणवायला लागेल. त्यामुळेच मिठागरांवर इमारती बांधू देणार नाही, असा आमचा निर्णय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून तेही मिठागरांवर इमारती बांधू देणार नाही, या मताचे आहेत. मिठागरांवर इमारती बांधण्याची परवानगी गृहनिर्माण खाते कदापी देणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

भाजपनं उत्पल पर्रीकरांना ऑफर केलेल्या 2 जागा कोणत्या? ऑफर नाकारण्यामागची आतली बातमी

Anil Deshmukh: अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, कोठडीतील मुक्काम 14 दिवसांनी वाढला

भोपळा घेऊन घरी परतले काँग्रेसचे उमेदवार, राज्यात एकच चर्चा, वाचा नेमकं कुठं चुकलं गणित?

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.