‘मला आजोबांसारखंच अधिकारी व्हायचय’ MPSC परीक्षेत पहिला आलेल्या अभिषेकची यशोगाथा

कोरोनामुळे परीक्षा लांबली, वेळ हातातून निघून जात होता, पण अभिषेक धैर्यानं परिस्थितीला सामोरा गेला

'मला आजोबांसारखंच अधिकारी व्हायचय' MPSC परीक्षेत पहिला आलेल्या अभिषेकची यशोगाथा
अभिषेक सालेकर आणि त्याचे आईबाबाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 24, 2022 | 11:18 AM

कल्याण : एमपीएससी परीक्षेसाठी (MPSC Exam News) विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. सरकारी अधिकारी (Government Officer) होण्याचं स्वप्न उराशी बाळगून परीक्षांना सामोरं जातात. पण अनेकदा अपयश पदरी पडतं. पण काही यशोगाथा (Success Story) या प्रेरणादायी ठरतात. असंच काहीसं यश कल्याणमधील अभिषेक सालेकर या तरुणाने मिळवलंय. त्याच्या वाढदिवशीच एमपीएससी परीक्षेचा निकाल लागला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अभिषेक या परीक्षेत राज्यात पहिला आला होता. आई-वडील दोघंही शिक्षक. अभिषेक अभ्यासातही हुशार. पण आजोबांकडे पाहून त्याला आपणही अधिकारी व्हावं, असं वाटलं. त्यासाठी त्याने मेहनत घेतली. पण वाटेत अनेक अडचणी आल्या. पण त्याने हार नाही मानली. तो प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत कल्याणच्या वालधुनी परिसरात राहणाऱ्या अभिषेकने घवघवीत यश संपादन केलंय. अभिषेक सालेकर याने राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला. त्याने मिळवलेल्या यशाचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय.

पाहा लाईव्ह घडामोडी :

हे सुद्धा वाचा

कल्याण पश्चिम वालधुनी परिसरात भास्कर सालेकर आणि त्यांची पत्नी श्रद्धा सालेकर हे मुलगा अभिषेक सोबत राहतात. भास्कर व श्रद्धा हे दोघंही शिक्षक. भास्कर बीएमसी शाळेमध्ये शिक्षक. तर श्रद्धा या खाजगी शाळेत शिक्षिका. त्यांचा मुलगा अभिषेक हा पहिल्यापासूनच अभ्यासात प्रचंड हुशार.

अभिषेकने दहावीच्या परीक्षेत 96 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर अभिषेकने मागे वळून पाहिलेच नाही. मुळातच आई वडील दोन्ही शिक्षक असल्याने घरातूनच शिक्षणाचं बाळकडू अभिषेकला मिळालं होतं.

लहानपनापसून आपले आजोबा मुकुंद दामले यांच्याकडे पाहून आपणही त्यांच्यासारखं सरकारी अधिकारी व्हावं, असं अभिषेकचं स्वप्न होतं. अधिकारी होवून जनसेवा करावी, अशी इच्छा अभिषेकची होती. आजोबा मुकुंद हे बीएआरसीमध्ये अधिकारी पदावर कार्यरत होते. अभिषेकला आजोबांसारखंच अधिकारी व्हायचं होतं. त्यासाठी त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु केली.

अभिषेकने जिद्दीने अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत केलं. मॅकेनिकलपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर एमपीएससी स्पर्धा परीक्षांच्या तयारीला तो लागला. मार्च 2020 मध्ये त्याने परीक्षेची पहिली पायरी चढली. मात्र कोरोनाने खो घातला. लॉकडाऊन लागलं आणि परीक्षा लांबणीवर गेली.

पण अभिषेकने हार मानली नाही. परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. त्याच बरोबर खाजगी कंपनीत नोकरीही सुरू केली. एमपीएससीच्या परीक्षा जाहीर झाल्या. परिवहन विभागातील सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक पदासाठी त्याने परीक्षा दिली.

नोव्हेंबर 2021 मध्ये ही परीक्षा होणार होती. अभिषेकने दिवसातील 13 तास अभ्यास केला. यामधे अभिषेकला त्याचे शिक्षक, आई वडिलांची साथ, मार्गदर्शन मिळत होते.

परीक्षा झाली आता प्रतीक्षा होती परीक्षेच्या निकालाची. विशेष म्हणजे 21 तारखेला अभिषेकच्या वाढदिवसाच्या निकालाच्या दिवशीच निकाल जाहीर झाला. आपण चांगल्या मार्कने उत्तीर्ण होणार अशा विश्वास अभिषेक आणि त्यांच्या कुटुंबीयांना होता. मात्र राज्यात प्रथम क्रमांक मिळेल, असं वाटलं नव्हतं.

तब्बल पाच हजार मुलं या परीक्षेला बसली होती. त्यातून अभिषेकने बाजी मारली. या यशाबद्दल बोलताना अभिषेक याने नियमित व नियोजनबद्ध अभ्यासामुळे हे यश मिळाल्याचं म्हटलंय. आपल्या यशाचे श्रेय त्याने आपले आई-वडील, शिक्षक यांना दिलंय. कोकणातील खेड तालुक्यातील मुंबके गावातील आमच्या घराण्यातील तिसरी पिढी प्रशासकीय सेवेत दाखल होताना विशेष आनंद होत आहे, असंही तो म्हणला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.