Video : अजगर बघण्यासाठी आले, वाहतूक कोंडी करुन गेले! पाहा नेमकं काय घडलं?

Kalyan News : कल्याण शीळ रोडच्या दोन्ही बाजूला पूर्वी मोठी वनसंपदा होती. मात्र आता या परिसरात गृहसंकुलांची संख्या प्रकल्प वाढलीय. त्यामुळे या परिसरातील वन्य प्राण्यांचं अस्तित्त्वही धोक्यात आले आहे.

Video : अजगर बघण्यासाठी आले, वाहतूक कोंडी करुन गेले! पाहा नेमकं काय घडलं?
कल्याणमध्ये अजगर..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 1:40 PM

कल्याण : कल्याण (Kalyan News) शिळ रोड हा नेहमीच गजबजलेला रस्ता म्हणून ओळखला जातो. या मार्गावर आधीच वाहनांची वर्दळ प्रचंड असते. त्यातही या मार्गावर वाहतूक कोंडी (Traffic Update) होणं ही काही नवी बाब नाही. मात्र यावेळी झालेल्या वाहतूक कोंडीचं कारण वाहनांची वर्दळ नसून एक महाकाय अजगर होता. ऐकून नवल वाटेल, पण हे खरंय. कल्याण शिळ मार्गावर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एका अजगराला जीवदान देण्यात आलं. एका कॉम्लेक्समध्ये अजगर आढळून आला होता. हे कळताच लगेचच अजगराला (Huge Python Video) पकडण्यासाठी सर्पमित्रांना पाचारण केलं गेलं. सर्पमित्रांनीही गांभीर्य ओळखून लगेचच धाव घेतली. अजगराला पकडलं. त्यानंतर पकडलेल्या अजगराला पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली. ही गर्दी इतकी वाढली, की वाहतूक कोंडी करुन गेली. बघ्यांनी अजगराला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी गर्दी केली होती.

दोघा सर्पमित्रांनी अजगराला पकडलं होतं. पण त्यांना लोकांनी गराडा घातला होता. ही गर्दी मुख्य रस्त्यापर्यंत आली होती आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे पकडण्यात आलेल्या अजगराला जीवदान देण्यात सर्पमित्रांना यश आलंय. सर्पमित्रांनी या अजगराला अखेर वनविभागाच्या स्वाधीन केलंय.

हे सुद्धा वाचा

बघ्यांच्या गर्दीने वाहतूक कोंडी

कल्याण शीळरोड वरील एका गृह संकुलाच्या ठिकाणी तब्बल दहा फुटांचा अजगर सापडला होता. शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वर्दळीच्या ठिकाणी अजगराने दर्शन दिल्याने नागरिकांचीही भंबेरी उडाली. अजगराला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. तर बघ्यांच्या गर्दीमुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी देखील झाली. याची माहिती मिळताच तातडीने सर्प मित्र पूर्वेश कोरी आणि राहुल जगन्नाथ यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी भेट देत अजगराला पकडून ताब्यात घेतलं आणि वनविभागाच्या स्वाधीन केलं.

कल्याण शीळ रोड वरील मानपाडा जवळ असलेल्या गृह संकुलाच्या प्रकल्पाला लागून असलेल्या ठिकाणी हा अजगर आढळला. तब्बल 13.50 किलो वजनाचा आणि 10 फूट लांबीचा हा अजगर पकडल्यात यश आलंय. डोंबिवलीमधील सर्पमित्रांनी त्याला पकडून कल्याणच्या वन विभागाच्या स्वाधीन केले आहे.

पाहा व्हिडीओ :

कल्याण शीळ रोडच्या दोन्ही बाजूला पूर्वी मोठी वनसंपदा होती. मात्र आता या परिसरात गृहसंकुलांची संख्या प्रकल्प वाढलीय. त्यामुळे या परिसरातील वन्य प्राण्यांचं अस्तित्त्वही धोक्यात आले आहे. याच परिसरातील घारीवली परिसरात असलेल्या मोठी वनसंपदा नष्ट झाल्यात. आता या परिसरातील साप देखील नागरिकांना वर्दळीच्या जागी वारंवार दिसू लागलेत आहेत.

Non Stop LIVE Update
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.