डोंबिवलीत ज्वेलर्स व्यापाऱ्यावर दिवसाढवळ्या चाकूहल्ला, हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत झाली कैद

दिवसढवळ्या हा हल्ला झाला असल्यामुळे आणि कोणतेही साहित्याची चोरी केली गेली नसल्याने पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

डोंबिवलीत ज्वेलर्स व्यापाऱ्यावर दिवसाढवळ्या चाकूहल्ला, हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत झाली कैद
Dombivali Gas CrimeImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 9:51 PM

डोंबिवली: डोंबिवलीत (Dombivli) दिवसाढवळ्या एका ज्वेलर्स व्यापाऱ्यावर चाकू हल्ला (Knife attack) करण्यात आल्याची घटना घडली आहे. डोंबिवलीतील पूर्वे भागातील मन्ना गोल्ड (Manna Gold) या दुकानात घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. डोंबिवली पूर्वेच्या आगरकर रोडवर मन्ना गोल्ड नावाचं ज्वेलर्स दुकान आहे. मंगळवारी दुपारी या दुकानाचे मालक तारकनाथ मन्ना हे दुकानात बसलेले असताना एका अज्ञात हल्लेखोराने दुकानात घुसून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला.

चेहऱ्यावर मास्क लावून हल्ला

ज्या हल्लेखोराने दुकान मालकावर हल्ला केला त्याने तोंडाला मास्क लावला होता. मालकावर चाकू हल्ला करण्यात आला असला तरी दुकानातील कोणतेही साहित्य पळवून अथवा चोरून घेऊन गेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचा संशय बळावला असून त्यानुसार पोलीस तपास करत आहेत.

साहित्याची चोरी नाही

दिवसढवळ्या हा हल्ला झाला असल्यामुळे आणि कोणतेही साहित्याची चोरी केली गेली नसल्याने पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. या घटनेनंतर जखमी तारकनाथ मन्ना यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांना याबाबत विचारले असता, तपास सुरू असून लवकरच संपूर्ण प्रकरणाचा छडा लावू, असं त्यांनी सांगितले.

जखमीला रुग्णालयात दाखल

या हल्ल्यात ज्वेलर्स व्यापारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मास्क बांधून आलेला हल्लेखोर नेमका कोण होता, त्याचा तपास पोलीस करत आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.