
ठाणे महापालिकेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. शहरात एकूण ११ ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, सकाळी १० वाजल्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होईल. तब्बल ९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होत असलेल्या या निवडणुकीत ३३ प्रभागांमधील १३१ जागांसाठी ६४१ उमेदवार रिंगणात आहेत. यंदा ५५.५९% मतदान झाले असून, २०१७ च्या तुलनेत यात ३% घट झाली आहे. या घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार आणि ठाणेकर सत्तेची किल्ली कोणाच्या हाती देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये २०१७ साली म्हणजेच जवळपास ८ वर्षांपूर्वी निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकांचे निकाल पाहाता भारतीय जनता पक्ष (BJP) पक्ष ३२ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. शिवसेना (SS) पक्षाला २५ जागा मिळाल्या. तिसऱ्या स्थानी भारताची धर्मनिरपेक्ष आघाडी पक्ष राहिला. त्यांना ११ जागा जिंकता आल्या.
| पक्षाचे नाव | जागांची संख्या |
|---|---|
| भारतीय जनता पक्ष (BJP) | ३२ |
| शिवसेना (SS) | २५ |
| भारताची धर्मनिरपेक्ष आघाडी | ११ |
| राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) | ४ |
| रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) | २ |
| राष्ट्रीय समाज पक्ष | १ |
| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) | १ |
| पीपल्स रिपब्लिकन पार्टी (RPI) | १ |
| भारिप बहुजन महासंघ (BBM) | १ |
| एकूण जागा | ७८ |
२०१७ मध्ये वसई विरार महानगरपालिकेच्या ११५ वॉर्डमधील ११५ जागांसाठी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत विविध पक्षांना खालीलप्रमाणे यश मिळाले होते. २०१७ साली या महानगरपालिकेत घेण्यात आलेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी (BVA) पक्षाने १०६ जागांसह विजयी बहुमत प्राप्त केले. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर ५ जागांसह शिवसेना (SS) पक्षाची कामगिरी राहिली.
| पक्षाचे नाव | जागांची संख्या |
|---|---|
| बहुजन विकास आघाडी (BVA) | १०६ |
| शिवसेना (SS) | ५ |
| स्वतंत्र | २ |
| भारतीय जनता पक्ष (BJP) | १ |
| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) | १ |
| महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) | ० |
| इतर नोंदणीकृत पक्ष | ० |
| रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) | ० |
| एकूण जागा | ११५ |
भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेत सत्ता कोणाची असणार, हे ‘मॅजिक फिगर’वर (बहुमताचा आकडा) अवलंबून असते.
| तपशील | संख्या |
| एकूण वॉर्ड (Wards) | २३ |
| एकूण प्रभाग/जागा (Total Seats) | ९० |
| बहुमतासाठी आवश्यक जागा (Magic Figure) | ४६ |
मीरा-भाईंदर महानगरपालिकेत एकूण २४ वॉर्ड असून त्यांतर्गत ९५ प्रभाग विभागलेले आहेत. यानुसार एकूण ९५ नगरसेवक निवडून येतात. या महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला ४८ किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकणे आवश्यक आहे.
भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेमध्ये एकूण २३ वॉर्ड आहेत. या वॉर्डांतर्गत एकूण ९० प्रभाग (जागा) येतात. म्हणजेच भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेमधून संपूर्ण शहरातून एकूण ९० नगरसेवक निवडून दिले जातात.
भिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक २०१७ मध्ये जवळपास ८ वर्षांपूर्वी निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकांचे निकाल पाहाता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) पक्ष ४७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भारतीय जनता पक्ष (BJP) पक्षाला २० जागा मिळाल्या. तिसऱ्या स्थानी शिवसेना (SS) पक्ष राहिला. त्यांना १२ जागा जिंकता आल्या.
| पक्षाचे नाव | जागांची संख्या |
|---|---|
| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) | ४७ |
| भारतीय जनता पक्ष (BJP) | २० |
| शिवसेना (SS) | १२ |
| कोणार्क विकास आघाडी | ४ |
| रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावाडी (RPI) | ४ |
| समाजवादी पक्ष (SP) | २ |
| स्वतंत्र | १ |
| एकूण जागा | ९० |
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत काल पार पडलेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी स्पष्ट झाली आहे. एकूण १४,२५,०८६ मतदारांपैकी ५२.११ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचा उत्साह काहीसा कमी दिसून आला.
कल्याण-डोंबिवलीत एकूण ८ ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. पोलिसांनी मतमोजणी केंद्रांच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे.
काल पार पडलेल्या मतदानात केडीएमसी क्षेत्रात एकूण ५२.११ टक्के इतके मतदान झाले आहे. केडीएमसीच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ४९० उमेदवार उतरले आहेत. आज त्यांचे भवितव्य बाहेर येणार आहे. एकूण १२२ प्रभागांपैकी २० जागांवर आधीच बिनविरोध निवड झाली असल्याने उर्वरित जागांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कल्याण-डोंबिवलीत मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या १०२ प्रभागांसाठी आज मतमोजणी होत आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासूनच कल्याण पश्चिम येथील मुंबई विद्यापीठ केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले असून, थोड्याच वेळात प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल.
ठाणे महापालिकांची प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.
| प्रभाग समिती | प्रभाग क्रमांक | मतदानाची टक्केवारी (%) |
| माजिवडा | १, २, ३, ८ | ५४.७५% |
| वर्तकनगर | ४, ५, ७ | ५४.८६% |
| लोकमान्य सावरकरनगर | ६, १३, १४, १५ | ५८.०९% |
| वागळे | १६, १७, १८ | ५५.५३% |
| नौपाडा कोपरी | १९, २०, २१, २२ | ५९.७९% |
| उथळसर | १०, ११, १२ | ६०.६०% |
| कळवा | ९, २३, २४, २५ | ५४.२९% |
| मुंब्रा | २६, ३१ | ४७.५९% |
| मुंब्रा | ३०, ३२ | ४९.१५% |
| दिवा | २७, २८ | ५७.३७% |
| दिवा | २९, ३३ | ५६.४५% |
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी 15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मतदानाच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण 55.59 टक्के मतदान झाले असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली. ठाणे महानगरपालिकेच्या एकूण 33 प्रभागांमध्ये एकूण 2013 मतदान केंद्रावर गुरूवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या 33 प्रभागांमध्ये 8 लाख 63 हजार 879 पुरूष, 7 लाख 85 हजार 831 महिला आणि 159 इतर असे एकूण 16 लाख 49 हजार 869 मतदार होते. त्यापैकी 483698 पुरूष , 433385 स्त्री आणि 40 इतर असे एकूण 917123 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा (BVA) गड समजल्या जाणाऱ्या वसई-विरारमध्ये महायुतीने यावेळी तगडे आव्हान दिले आहे. बहुजन विकास आघाडी आपला बालेकिल्ला राखणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच एक्झिट पोलच्या आकड्यांवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. बहुतेक एक्झिट पोलनुसार (Axis My India आणि JVC), ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईत महायुतीला (भाजप + शिवसेना – एकनाथ शिंदे) स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.
ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीसह सर्वत्र सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.
ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीसह २९ महानगरपालिकांच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. २३ केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे गुलाल कोण उधळणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका निवडणुकीचे पक्षीय बलाबल आणि बहुमताचे आकडे. कोणत्या पक्षाला किती जागांची गरज?
| महानगरपालिका | एकूण जागा | बहुमताचा आकडा | विशेष टिप्पणी |
| ठाणे (TMC) | १३१ | ६६ | ४ जागांवर महायुती आधीच बिनविरोध |
| कल्याण-डोंबिवली (KDMC) | १२२ | ६२ | २० जागांवर महायुती बिनविरोध (भाजप १४, शिवसेना ६) |
| नवी मुंबई (NMMC) | १२२ | ६२ | गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला |
| पनवेल (PMC) | ७८ | ४० | भाजपचा बालेकिल्ला राखण्याचे आव्हान |
| मिरा-भाईंदर (MBMC) | ९५ | ४८ | महायुती आणि अपक्षांमध्ये मोठी चुरस |
| उल्हासनगर (UMC) | ७८ | ४० | स्थानिक आघाड्यांची भूमिका निर्णायक |
ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील ८ महापालिकांच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणी केंद्रांच्या १०० मीटर परिसरात जमावबंदी लागू असणार आहे. सीसीटीव्ही आणि निमलष्करी दलाच्या देखरेखीखाली मतमोजणीची तयारी करण्यात आली आहे.
ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईतील मतमोजणी केंद्रांवर निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आगमन सुरु झाले आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात काही वेळातच स्ट्राँग रूम उघडल्या जाणार आहेत.
आज राज्याच्या २९ महापालिकांचे निकाल जाहीर होणार आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे तर नवी मुंबईत गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळी १० वाजल्यापासून सुरुवातीचे कल हाती येण्यास सुरुवात होईल.
मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक असताना अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार किंग ठरले आहेत. कल्याण-डोंबिवली (KDMC) मध्ये तब्बल २० जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात भाजपचे १४ आणि शिंदे गटाच्या ६ उमेदवारांचा समावेश आहे. तसेच ठाण्यातही ४ जागांवर महायुतीने मतदानाआधीच खाते उघडले आहे.
काल पार पडलेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.
KDMC Mahapalika Election Results : KDMC २०१५ निकाल : शिवसेना-भाजप युतीची सत्ता; कल्याण-डोंबिवलीत गेल्या वेळी कोणाला किती जागा मिळाल्या होत्या?
ठाणे महानगरपालिका २०१७ चे चित्र: शिवसेनेचा बालेकिल्ला! २०१७ च्या निवडणुकीत ठाण्यात शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली होती. तेव्हाचे पक्षनिहाय बलाबल
NMMC Election Results 2026 LIVE : नवी मुंबई महानगरपालिकेच्या २०१५ च्या निवडणुकीत गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने बाजी मारली होती
Thane, KDMC, Navi Mumbai Municipal Election 2026 : ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, मिरा-भाईंदर या महत्त्वाच्या महापालिकांच्या मतदानानंतर आज निकाल जाहीर होणार आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. यंदा शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतरचा हा पहिलाच मोठा स्थानिक निकाल असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.
Thane, NMMC, KDMC LIVE Updates : ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि वसई-विरार या पाच महत्त्वाच्या महानगरपालिकांचे भवितव्य आज स्पष्ट होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. महायुती आपला गड राखणार की महाविकास आघाडी मुसंडी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
TMC KDMC NMMC UMC Election Results 2026 LIVE : मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल, भिवंडी-निजापूर, मिरा-भाईंदर, वसई-विरार आणि उल्हासनगर या आठ महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. गुरुवारी पार पडलेल्या मतदानानंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे त्यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची मानली जात आहे. तर नवी मुंबईत गणेश नाईक विरुद्ध महाविकास आघाडी अशी काटे की टक्कर सामना रंगला आहे. तसेच कल्याण-डोंबिवलीच्या रिंगणात महायुती बाजी मारणार का आणि वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व मोडीत निघणार का, याचा फैसला आता काही क्षणांतच होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या लढतीत मतदारांनी कुणाला कौल दिला आहे. त्यासोबतच कोणता बालेकिल्ला शाबूत राहणार आणि कुठे उलथापालथ होणार याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल, भिवंडी-निजापूर, मिरा-भाईंदर, वसई-विरार आणि उल्हासनगर या महापालिकांचे प्रभागनिहाय विजयी उमेदवार, पक्षांची आघाडी-पिछाडी आणि दिग्गज नेत्यांच्या भविष्याचे सर्वात वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या या लाईव्ह ब्लॉगला रिफ्रेश करत राहा.