डोंबिवलीत मनसेकडून मोफत लसीकरण, रिक्षा चालक आणि नाभिकांना प्राधान्य

मनसे आमदार राजू पाटील यांनी पुढाकार घेत रिक्षा चालक आणि नाभिक समाजाच्या लसीकरणासाठी तयारी केली आहे (MNS MLA Raju Patil organize vaccination program).

डोंबिवलीत मनसेकडून मोफत लसीकरण, रिक्षा चालक आणि नाभिकांना प्राधान्य
मनसे आमदार राजू पाटील


डोंबिवली (ठाणे) : एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीची कमतरता दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती यामुळे नागरिकांना लसीसाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. ज्या नागरिकांमुळे कोरोना पसरण्याची भीती जास्त आहे त्या नागरिकांचे लसीकरण झाले पाहिजे. यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी पुढाकार घेत रिक्षा चालक आणि नाभिक समाजाच्या लसीकरणाची तयारी केली आहे (MNS MLA Raju Patil organize vaccination program).

केडीएमसी क्षेत्रात आतापर्यंत 3 लाख 75 हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 3 लाख 75 हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून लसींची कमतरता आहे. दुसरीकडे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. नागरीक लसीकरीता वणवण फिरत आहेत. कोणत्याही परिस्थितीत लसीकरण करण्यासाठी आव्हान आहे. रिक्षा चालक आणि नाभिक समाजामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. कारण हे दोघी घटक नेहमी शहरातील नागरीकांच्या संपर्कात येतात. त्यांच्या लसीकरणासाठी मनसे आमदार पाटील यांनी पुढाकार घेतला आहे (MNS MLA Raju Patil organize vaccination program).

तीन दिवसात 2 हजार नागरिकांच्या लसीकरणाचे ध्येय

डोंबिवली पूर्व भागातील प्रिमिअर मैदानावर लसीकरण केंद्र उभारले जात आहे. या ठिाकणी सर्व व्यवस्था आहे. येत्या शनिवारी, रविवारी आणि सोमवारी या तीन दिवसात 2 हजार जणांचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. इतकेच नाही तर जीम करणाऱ्यांनाही लस दिली जाणार आहे.

केडीएमसीत मोबाईल (व्हॅन) लसीकरणाला सुरुवात

केडीएमसीत आता मोबाईल (व्हॅन) लसीकरणही केलं जात आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते आज कल्याण पूर्व येथील आय प्रभाग कार्यालय येथे मोबाईल (व्हॅन) लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली काशीकर उपस्थित होते.

लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या या भागात तुलनेने कमी लसीकरण झाले असल्यामुळे आज या परिसरापासून मोबाईल लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. लोकांचा प्रतिसाद पाहून हळूहळू लसीकरणाचा टप्पा वाढविला जाईल, या भागातील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण व्हावे, म्हणून ही सुविधा उपलब्ध करुन दिली असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : मनसे आमदार राजू पाटलांची सुपारी, दोघांकडून रवी पुजारीला तब्बल 15 लाख, जाणून घ्या पूर्ण प्रकरण

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI