AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray Thane Uttar Sabha Live: यांचे दाखवायचे ‘सुळे’ वेगळे, राज ठाकरेंच्या निशाण्यावर पुन्हा सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळेंनी बोलायंच काय हो. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळेत. सुप्रिया सुळे सांगतायत, लाव रे तो व्हिडीओने घाबरतील असं. अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण तुमच्या घरी पडत नाही. याचं कारण मला कळेल का ? पवार साहेब मोदींची भेट घेतात, पुढचं सांगायला.

Raj Thackeray Thane Uttar Sabha Live: यांचे दाखवायचे 'सुळे' वेगळे, राज ठाकरेंच्या निशाण्यावर पुन्हा सुप्रिया सुळे
यांचे दाखवायचे 'सुळे' वेगळे, राज ठाकरेंच्या निशाण्यावर पुन्हा सुप्रिया सुळेImage Credit source: tv9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 13, 2022 | 12:41 AM
Share

ठाणे : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाण्यातील उत्तर सभेत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)चा चांगलाच समाचार घेतला आहे. राज ठाकरेंनी पवार कुटुंबीयांवरही सडकून टीका केली आहे. अजित पवारांच्या घरी, त्यांच्या बहिणींच्या घरी रेड पडते. त्यानंतरही पवार आणि मोदींचे मधुर संबंध राहतात, कसं काय ? पवार साहेबांना कधीही भडकलेलं बघितलेलं नाही. सुप्रिया सुळें (Supriya Sule)नी बोलायंच काय हो. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत. सुप्रिया सुळेंनी बोलायंच काय हो. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळेत. सुप्रिया सुळे सांगतायत, लाव रे तो व्हिडीओने घाबरतील असं. अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण तुमच्या घरी पडत नाही. याचं कारण मला कळेल का ? पवार साहेब मोदींची भेट घेतात, पुढचं सांगायला. (MNS president Raj Thackeray targets Supriya Sule at a meeting in Thane)

पवार साहेब खूश झाले की भीती वाटायला लागते

देशमुख गेले. परत भेट घेतली. अजितचं काय? परत भेट. मलिक जरा हल्ली गडबड करतो, थोडं लक्ष द्या. पुन्हा खासदारांचा फोटो काढला. परत भेट. असं म्हणे, आत काय बोलले माहीत नाही. मी त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणात बोललो होतो. पवार साहेब खूश झाले की भीती वाटायला लागते. आज ते राऊंतावर खूश आहेत. कधी टांगलेला मिळेल, कळणार पण नाही. यात काँग्रेसवालेपण आहेत. आणि उशिरा समजतं की तेव्हा ते बोलले होते ते आज लागलं.

जयंत पाटलांवरही राज ठाकरेंचा निशाणा

बघा जंत पाटील काय म्हणतायेत. हे कधी गेले होते यूपीत. यूपीत जर विकास झालेला असेल, तर त्याचा मला आनंद आहे. माझी भाषा काय आहे. ती जर तरची भाषा आहे. निवडणुकीच्या वेळेला मीच सांगतो की बिहार, झारखंड आणि यूपीकडे लक्ष द्यावं. या राज्यांचा विकास करावा. या तीन राज्यांमधून जी लोकं महाराष्ट्रात येतायत, त्यांचं ओझं राज्य उचलू शकत नाही. (MNS president Raj Thackeray targets Supriya Sule at a meeting in Thane)

इतर बातम्या

Raj Thackeray Uttar Sabha : राज ठाकरेंचा पवार, राऊतांवर हल्लाबोल; आता राऊतांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांचं जोरदार प्रत्युत्तर

Raj Thackeray Uttar Sabha Thane Live: उभा टाक, राज ठाकरेंनी भर सभेत नगरसेवक सलीम मामू शेखला जेव्हा उभं केलं

Follow Us
कृष्ण जन्माला गं आला बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्माला गं आला बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल