AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राला संजय राऊत यांची गरज, कारण त्यांच्यामुळे… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचं मोठं विधान

मला राऊत साहेबांची खूप काळजी वाटते. त्यांच्याबद्दल मला खूप सहानुभूती आहे. रोज सकाळी उठून कुणावरही ते आरोप करतात. मी एक डॉक्टर आहे. त्यामुळे त्यांच्या वागणुकीकडे पाहून मला वाटतं की, सिझोफ्रेनिया सारखा आजार त्यांना होतोय का?

महाराष्ट्राला संजय राऊत यांची गरज, कारण त्यांच्यामुळे... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचं मोठं विधान
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 23, 2023 | 2:33 PM
Share

अंबरनाथ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला मारण्यासाठी राजा ठाकूर याला सुपारी दिल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांनी गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांनाही तसं पत्रं पाठवलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी राजा ठाकूर याच्या पत्नी पूजा ठाकूर यांनी संजय राऊत यांच्याविरोधात पोलिसात तक्रारही नोंदवली होती. परंतु, श्रीकांत शिंदे यांनी त्यावर अद्याप प्रतिक्रिया दिली नव्हती. तब्बल दोन दिवसानंतर श्रीकांत शिंदे यांनी अखेर या प्रकरणावर मौन सोडलं आहे. आजारी असल्यामुळे श्रीकांत शिंदे हे प्रतिक्रिया देऊ शकले नव्हते.

माझ्यावरील आरोप हा हास्यास्पद प्रकार आहे. नरेश म्हस्के पुराव्यासकट बोलले आहेत. संजय राऊत यांचे सहकारी चिंदरकर यांचाही जबाब पोलिसांनी घेतला. आधी राऊत म्हणाले जीवे मारायची सुपारी दिली. मग जबाब दिला काळे फासणार आहेत. हे चिंदरकर यांनी सांगितल्याचं म्हणाल्यामुळे त्यांचा जबाब पोलीसांनी घेतला. मी कुणाचं नाव घेतलं नाही, असं चिंदरकरांनी आपल्या जबाबात म्हटलं होतं. त्यामुळे दोन्ही जबाबात विरोधाभास आहे, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

महाराष्ट्राची करमणूक होते

मला राऊत साहेबांची खूप काळजी वाटते. त्यांच्याबद्दल मला खूप सहानुभूती आहे. रोज सकाळी उठून कुणावरही ते आरोप करतात. मी एक डॉक्टर आहे. त्यामुळे त्यांच्या वागणुकीकडे पाहून मला वाटतं की, सिझोफ्रेनिया सारखा आजार त्यांना होतोय का? काल्पनिक, आभासी विश्वात ते राहतायत. महाराष्ट्राला संजय राऊत यांनी गरज आहे, कारण सकाळी त्यांच्यामुळे महाराष्ट्राची करमणूक होते. त्यामुळे त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असा खोचक टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला.

राऊतांविरोधात आंदोलन

दरम्यान, श्रीकांत शिंदे यांच्यावर राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. या शिवसैनिकांनी राऊत यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली आहेत. मुंबईच्या अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ राऊत यांच्याविरोधात शिवसेना कार्यकर्त्यांनी जोड़ मारो आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या फोटोला चप्पल आणि बूटांचा हार घातला. त्यानंतर या फोटोला चप्पल आणि बुटाने मारलं. त्यानंतर राऊत यांचा निषेधही नोंदवण्यात आला.

एवढेच नाही तर राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करताना शिवसेना कार्यकर्त्यांनी राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर खोटे आरोप केले आहेत, संजय राऊत यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. आंदोलनानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी डीएन नगर पोलीस ठाण्यात जाऊन राऊत यांच्याविरोधात लेखी तक्रार देऊन कारवाईची मागणी केली.

राऊत हे स्वत: सुपरीबाज आहेत. जामिनावर बाहेर आलेला माणूस आहे, उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांना बाजूला केले पाहिजे. राऊत हे संपलेले लाडू आहेत, त्यांना कचराकुंडीत फेकून द्या, अशी मागणी या शिवसैनिकांनी केली.

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.