मुंब्र्यात मराठी माणसालाच कान पकडून माफी मागायला लावली, फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितल्याचा राग

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहरात मराठी आणि हिंदी भाषेवरुन इतका वाद झाला की, मराठी तरुणाला कान पकडून माफी मागायला भाग पाडण्यात आलं.

मुंब्र्यात मराठी माणसालाच कान पकडून माफी मागायला लावली, फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितल्याचा राग
मुंब्र्यात मराठी माणसालाच कान पकडून माफी मागायला लावली
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 10:26 PM

‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’, असं म्हटलं तर काही वावगं नाही. कारण मराठी बोलण्याचा हट्ट केला म्हणून एका मराठी तरुणाला अमराठी भाजी विक्रेते आणि जमावाने कान पकडून माफी मागायला लावली. विशेष म्हणजे “आम्हाला मराठी बोलता येत नाही. आम्ही मराठी बोलणार नाहीत. काय करायचं आहे ते कर”, असंही गर्दीतील चेहरे बोलताना दिसले. अर्थात तरुणाने वाद घालताना “मराठी बोला, नाहीतर मुंब्रा बंद पाडेन”, असं वक्तव्य केलं होतं. त्याने अशाप्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाहीच. त्याचं अजिबात समर्थन करता येणार नाही. पण महाराष्ट्रात राहायचं, व्यवसाय करायचा आणि मराठी बोलता न येणं इथपर्यंत ठीक आहे, पण मराठी बोलणारच नाही, असं छातीठोकपणे बोलणाऱ्या अमराठी नागरिकांना नेमका काय मेसेज द्यायचा आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. त्यांना महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा द्वेष करायचा आहे का? असाही सवाल आता उपस्थित होतोय.

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहरात मराठी आणि हिंदी भाषेवरुन इतका वाद झाला की, मराठी तरुणाला कान पकडून माफी मागायला भाग पाडण्यात आलं. फळविक्रेताला मराठी का येत नाही? विचारले म्हणून जमावाने तरुणाला कान पकडून माफी मागायला लावली. विशेष म्हणजे मराठी तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी तक्रार दाखल केली. या मराठी तरुणाला मुंब्रा येथील जमावाने प्रचंड शिवीगाळ देखील केली.

नेमकं काय घडलं?

एक मराठी तरुण मुंब्र्यातील एका भाजी विक्रेत्याकडून फळ घेत असताना भाषेवरुन वाद झाला. मराठी तरुणाने फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितले. त्यावरुन वाद झाला. मला मराठी येत नाही. मी हिंदीत बोलणार, असं फळ विक्रेता बोलताच मराठी तरुण “महाराष्ट्रात रहायचे असेल तर मराठी आलेच पाहिजे, मी मुंब्रा बंद करुन टाकेन”, असं बोलू लागला. यामुळे इतर फळ विक्रेते आणि स्थानिक रहिवाशी यांनी येवून मराठी तरुणाला घेरले. मुंब्र्यात मराठी-हिंदी वाद का करतो, मुंब्रा शांत आहे शांत राहू दे, असं मुंब्र्यातील स्थानिक बोलू लागले.

हे सुद्धा वाचा

गर्दी वाढल्याने वाद चिघळला आणि लोकांनी त्या मराठी तरुणाला मुंब्रा पोलीस ठाणे येथे नेवून त्यावर एनसी तक्रार दाखल केली. आम्हाला मराठी येत नाही. काय करायचे ते कर, असं गर्दीतले लोकं बोलत होते. संबंधित घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हिंदी येते तर हिंदीत बोल. वाद कशाला करतो? असं बोलून जमावाने मराठी तरुणाला पोलीस ठाण्यात जमा केले. संबंधित तरुणाचं नाव विशाल गवळी असं असल्याची माहिती आहे. त्याला त्याच्या आईने फळे आणायला पाठवले होते.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....