जितेंद्र आव्हाड यांची भर पत्रकार परिषदेत शिवीगाळ, ‘मुंब्रा बंद’चा दिला इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज भर पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह शब्दांचा प्रयोग करत संताप व्यक्त केला. गाझियाबाद धर्मांतर प्रकरणाचा मुंब्र्याशी संबंध असल्याचा दावा करण्यात आलाय. याच प्रकरणावरुन त्यांनी संताप व्यक्त केला.

जितेंद्र आव्हाड यांची भर पत्रकार परिषदेत शिवीगाळ, 'मुंब्रा बंद'चा दिला इशारा
जितेंद्र आव्हाडImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 7:04 PM

ठाणे : “महाराष्ट्राचे पोलीस महासंचलक, ठाण्याचे पोलीस आयुक्त यांनी गाझियाबादच्या आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलेलं खरं आहे का? ते महाराष्ट्राला सांगावं. नाहीतर पुढच्या 1 जुलैला आम्ही मुंब्रा बंद करु. हे मस्करीत घेऊ नका”, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. गाझियाबादच्या पोलिसांनी मोठा दावा केला आहे. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यामातून मुंब्र्यातील 400 मुलांचं धर्मांतर केल्याचा आरोप करण्यात आला. याच आरोपांवर जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी 400 मुलांच्या धर्मांतराचा आरोप असलेल्यांपैकी 4 मुलं तरी दाखवल्यास आपण आमदारकीचा राजीनामा देऊ, असं म्हटलंय.

“महाराष्ट्रात जे काय सुरू आहे ते शासन पुरस्कृत दंगली होत आहेत. कालच गाझियाबादमधील एका आयपीएस अधिकाऱ्याने घोषित केले की मुंब्र्यामध्ये 400 मुलांचे धर्मांतर केले. हा मुंब्र्याला बदनाम करण्याचा प्रकार तर आहेच, त्यासोबत हिंदू धर्माला बदनाम करण्याचा विषय आहे. हिंदू धर्माचे मुलं एवढे मूर्ख आहेत का धर्मांतर करायला? त्या आयपीएस अधिकाऱ्याने पेपरवर आकडा सांगावा. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ही बातमी आहे. त्या आयपीएसने 4 नावं दाखवावी. याची दखल महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी घेतली पाहिजे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“ही काय मस्करी लावलीय का? तुम्ही एका शहराला बदनाम करताय. त्या शहराची अर्थव्यवस्था धुळीस मिळवताय. मुंब्रा, शिळमध्ये आज कमीतकमी 5 लाख स्क्वेरफूट अधिकृत बांधकाम सुरु आहे. ही घरं घेण्यासाठी तिथे लोकांची धावपळ आहे”, असं आव्हाड म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘कोण बेअक्कल ऑफिसर आहे?’

“एका सिनियर आयपीएसने पत्रकारांना बातमी द्यायची, कोण बेअक्कल ऑफिसर आहे? याचे खंडन महाराष्ट्रातून झाले पाहिजे. केवळ महाराष्ट्राची निवडणूक जिंकण्यासाठी काय पातळीवर राजकारण चाललंय? केवळ जितेंद्र आव्हाड तिथे आहे म्हणून हे चाललंय. आरे माझ्या एकट्यासाठी तुम्ही काय-काय करणार आहात?”, असा सवाल आव्हाडांनी केला.

“आता कोणी धर्मांतरं करत नाही. आता संविधान आलंय. संविधानाच्या आधारावर कोणी धर्मांतर करत नाही. एक काळ होता धर्मांतरचा. तेव्हा तुम्ही त्याला देवळात जाऊ देत नव्हते. त्यांना पाणी पिऊ देत नव्हते. त्यांची सावली तुम्हालाच चालत नव्हती. त्यांची थुंकी तुम्हाला चालत नव्हती. त्यांना गावकुसा बाहेर ठेवायचे म्हणून धर्मांतर व्हायचे. माझ्या धर्मात सन्मान वागणूक मिळत नाही म्हणून दुसऱ्या धर्मात जायचे. पण आता संविधानाने सन्मानाने जगायला मिळतंय. तुम्ही आज संविधानवर तलवार चालवताय”, असं आव्हाड म्हणाले.

‘…तर मी राजीनामा द्यायला तयार’

“हिंदू धर्माचा अवमान करणारे कोण आहेत? त्यांचा पुरावा मागतोय. 400 पोरं धर्मांतर करताय. 4 पोरं दाखवा, मी राजीनामा द्यायला तयार आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. “हे सर्व शिजवलेले नाट्य आहे. महाराष्ट्रात दारुण पराभव दिसतोय. 100 चा आकडाही ओलांडणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून उत्तर प्रदेशमधून फुसका बार सोडून द्यायचा. मी 4 महिन्यांपूर्वी बोललो होतो. यापुढे महाराष्ट्रात दंगली घडविल्या जाणार आणि त्याची पार्श्वभूमी राजकीय असेल”, असंही ते म्हणाले.

“तुमच्या राजकारणापायी, हव्यासापायी अख्खा महाराष्ट्र्र जाळून टाकाल. हा वणवा आहे. यात कोणी वाचणार नाही. सर्वच जाळून खाक होतील. झोपड्या जळताना ही झोपडी कोणत्या जातीची आहे म्हणून जळणार नाही तर अख्ख प्लास्टिक घेऊन जळणार आहे”, असा दावा आव्हाडांनी केला.

‘आमचं शहर बदनाम होऊ देणार नाही’

“आमचं शहर असं बदनाम होऊ देणार नाही. या शहराला इतिहास आहे. इथं प्राचीन मुंब्रा देवी आहे. येथील संस्कृती एकोप्याची आहे. येथील कौसा गावाला 600 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. याच ठिकाणी स्वातंत्र्याच्या काळात महात्मा गांधी यांनी येथील मशिदीमध्ये पाणी पिऊन मिटिंग घेतली आणि पुण्याला गेले आहेत”, असं आव्हाडांनी सांगितलं. “मी वकीलांशी बोललो आहे. आम्हाला याबाबत सर्वोच्च न्यायालयात जाता येत का? आम्हाला सत्य परिस्थिती सांगा”, असंही आव्हाडांनी सांगितलं.

“मी या शहराचा प्रतिनिधी आहे. यावर सरकारला उत्तर द्यावेच लागेल. कोण तो गाजियाबादचा आयपीएस, केरला सिनेमात 32 हजार पोरींचे धर्मांतर दाखवलं, अरे हिंदू धर्मातील पोरींना आकला नाहीत का? तुम्ही आमच्या आई-बहिणीच्या आकला काढता काय? जसं की ह्यांना आकालाच नाहीत. आताची पिढी भयंकर हुशार आहे. ती कुणाच्या ट्रॅपमध्ये येणार नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आव्हाडांकडून शिवीगाळ

‘मुंब्रा, ठाणेमध्ये एखादी अफवा सोडायची, शहरात हवा सोडायची आणि त्यातून जातीय दंगल घडवायची, असा माझा आरोप आहे. त्यांनी धर्मातर करणारे 400 सोडा 4 पोरांची नावं सांगितली तर ***** **खालून जाईन”, अशी शिवीगाळ करत जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.

Non Stop LIVE Update
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही.
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी.
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर...
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर....
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात..
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात...
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज.
आंदोलन होतं विशाळगडासाठी, टार्गेट झालं गजापूर, नेमका कोणी घातला धुडगूस
आंदोलन होतं विशाळगडासाठी, टार्गेट झालं गजापूर, नेमका कोणी घातला धुडगूस.
मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा, आंबेडकरांच्या भूमिकेवरही सवाल
मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा, आंबेडकरांच्या भूमिकेवरही सवाल.
बहिणीनंतर भाऊही लाडके...शिंदेंकडून नव्या योजना, कोण पात्र अन् अटी काय?
बहिणीनंतर भाऊही लाडके...शिंदेंकडून नव्या योजना, कोण पात्र अन् अटी काय?.
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?.
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?.