NCP Camp : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात 304 जणांना ऑन दि स्पॉट दाखले वाटप

| Updated on: Jul 25, 2022 | 3:14 AM

या मोफत दाखले वाटप शिबिरामध्ये रहिवास दाखला, अधिवास दाखला (डोमेसाईल), ज्येष्ठ नागरिक दाखला, उत्पन्न दाखले यांचे माजी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले. या शिबिराचा सुमारे 1013 जणांनी लाभ घेतला.

NCP Camp : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात 304 जणांना ऑन दि स्पॉट दाखले वाटप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात 304 जणांना ऑन दि स्पॉट दाखले वाटप
Image Credit source: TV9
Follow us on

ठाणे : घोडबंदर रोडवरील विजय नगरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)ने आयोजित केलेल्या दाखले (Certificates) वाटप शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अवघ्या एकाच दिवसात सुमारे 1013 जणांनी विविध दाखल्यांसाठी आपले अर्ज दाखल केले. त्यापैकी 304 जणांना ऑन दि स्पॉट दाखले देण्यात आले असून उर्वरित 709 जणांना 8 दिवसात दाखले प्रदान करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते, विधान सभेचे विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घोडबंदर रोडवरील विजय नगरी गृहसंकुलाच्या क्लब हाऊसमध्ये दाखले वाटप शिबिरा (Camp)चे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे-पालघर समन्वयक तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे-पालघर महिला विभागाध्यक्षा ॠताताई आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये शिबिर संपन्न झाले.

सुमारे 1013 जणांनी घेतला या शिबिराचा लाभ

या मोफत दाखले वाटप शिबिरामध्ये रहिवास दाखला, अधिवास दाखला (डोमेसाईल), ज्येष्ठ नागरिक दाखला, उत्पन्न दाखले यांचे माजी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले. या शिबिराचा सुमारे 1013 जणांनी लाभ घेतला. यावेळी विविध चाचण्या करुन तहसीलदार कार्यालयाच्या वतीने जागेवरच सुमारे 304 जणांना दाखले देण्यात आले. तर, वेळेअभावी ज्या 709 जणांचे दाखले झाले नाहीत, त्यांना येत्या आठ दिवसात दाखले प्रदान करण्यात येणार आहेत. विविध दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना तहसीलदार कार्यालयात पायपीट करावी लागत असते. मात्र, हे दाखले वेळेवर मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संबंध शहरभर असे शिबिर आयोजित करण्यात येत आहेत. या शिबिरात आम्ही नागरिकांना विनाशुल्क दाखले प्रदान करीत आहोत. अशा पद्धतीच्या शिबिरांमुळे नागरिकांना एकाच छताखाली विविध दाखले मिळत आहेत, असे आव्हाड म्हणाले.

महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी, सामाजिक न्याय विभागाचे कैलास हावळे, हॉकर्स सेलचे सचिन पंधारे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उमेश अग्रवाल, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शशिकला पुजारी, परिवहन सदस्य नितीन पाटील, विधानसभाध्यक्ष पुरूषोत्तम पाटील, विजय भामरे, कांता गजमल, राणी देसाई, श्रीकांत भोईर, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष गजानन चौधरी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रभाकर सावंत यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (On the spot certificates distributed to 304 people in NCP camp)

हे सुद्धा वाचा